सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या प्रयत्नामुळे विष प्राशन केलेल्या प्रशांत भोरे चे प्राण वाचले काका मला जगायचंय मला वाचवा प्रशांत भोरे ची हाक

 जामखेड प्रतिनिधी 


सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या प्रयत्नामुळे विष प्राशन केलेल्या प्रशांत भोरे चे प्राण वाचले
काका मला जगायचंय मला वाचवा प्रशांत भोरे ची हाक




मृत्युच्या दारात असणाऱ्या प्रशांत भोरे रुग्णास उपचार मिळत नाही ?


जामखेड सरकारी दवाखान्याचा रामभरोसे अजब कारभार


विष प्राशन केलेल्या रुग्णास उपचार न करता डॉक्टरने स्थलांतर (रेफर टू अहमदनगर)पत्र देऊन जबाबदारी निभावली

बे जाबदार डॉक्टरा वर कारवाई कधी होणार संजय कोठारी

जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयाचा कारभार रामभरोसे झाला असुन बर्याच रुग्णास येथे उपचार केला जात नाही तर उलट उलटी उत्तरे देऊन उपचार न करताच रुग्णाची हाकलपट्टी होतेय याला जबाबदार कोण ?

तर विष प्राशन केलेल्या अत्यंत गंभीर अशा प्रशांत राजेंद्र भोरे मुक्काम पोस्ट देवदैठण तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर रुग्णास उपचार न करता नगरच्या दवाखान्यात जाण्याचे स्थलांतर पत्र देऊन जबाबदारी झटकणाऱ्या डॉ. शशिकांत वाघमारे यांची चौकशी होऊन कारवाई करण्याची संजय कोठारी यांची मागणी

जामखेड तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय म्हणजे गोरगरीबां साठी असणारा सरकारी दवाखाना हा असुन अडचण तर नसुन खोळंबा असा झाला आहे येथील कार्यरत असणारे वैद्यकीय अधिक्षक मनमानी आणी बे फीकिरीने वागतात  कुठलीच सेवा सुवीधा गोर गरीबांना दिली जात नाही शासनाने उपलबद्ध करून दिलेल्या सेवा सुविधा येथे बंद आहेत एक्सरे, रक्त लाघवी तपासणीस टाळाटाळ व हलगर्जी पणा केला जातोय तसेच सलाईन देणे अथवा रुग्ण दाखल करण्यास टाळाटाळ केली जाते वैद्दकीय अधिकारी अरेरावीची भाषा करतात या सर्व गोष्टीस जबाबदार कोण असाच प्रश्न उपस्थित होत असुन या संदर्भात वेळोवेळी वरिष्ठा कडे तक्रार नोंदवुण सुध्दा कसलीच दखल घेतली जात नसल्याची खंत सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी व्यक्त करत सदर डॉक्टरावर त्वरीत कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे

नऊ डिसेंबर रोजी जामखेड तालुक्यातील देवदैठण येथील विष प्राशण केलेला प्रशांत भोरे हा रुग्ण उपचारासाठी सरकारी दवाखान्यात आला असता त्यावेळी कार्यरत असणारे वैद्यकीय अधिक्षक डॉ शशांक वाघमारे यांनी उपचार करण्याअगोदर त्याला नगरच्या दवाखान्याचे स्थलांतर पत्र देऊन दवाखान्याबाहेर हाकलले विशेष म्हणजे तो हॉस्पिटल मधून चालत संजय कोठारी यांच्याकडे आला मात्र हेच कृत्ये सामाजीक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी पाहीले तेव्हा काका मला वाचवा मला जगायचे आहे माझा उपचार करायला सांगा यावेळी त्यास खूप उलटी झाली अशा करुणा दायक आरोळ्या प्रशांत भोरे या रुग्णाने दिल्याने संजय कोठारी यांनी ही बाब पोलीसांना कळवताच पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी त्वरीत दखल घेत सदर रुग्णास पोलीसा सोबत पुन्हा त्याच सरकारी रुग्णालयात दाखल करून उपचार सुरु केले आहेत मात्र रुणाची प्रकृती चिंताजनक असुन तो वाचेल का नाही हाच प्रश्न आहे दुसऱ्या दिवशी सकाळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर युवराज खराडे यांनी त्याची दखल घेऊन त्याच प्राथमिक उपचार केले ताबडतोब १०८ उपलब्ध करून त्यास नगरला सिविल हॉस्पिटल ला रवाना केले

यासाठी वेळीच उपचार सुरू का झाले नाहीत ? उशीराने उपचार का ? आता रुग्णाचे काही बरे वाईट झाले तर त्यास जबाबदार कोण ? नंतर उपचार सुरू केले मग आधीच उपचार का केले नाहीत ? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित असुन रुग्ण जामखेड रुग्णालयातील कॉटवर मृत्युंशी झुंज देत आहे हे मात्र खरे

हा अजब कारभार आणी सरकारी डामडौल सर्वसामान्याच्या किती कामाचा याचा बोध घेतलेलाच बरा

आणी खरोखर सरकारी दवाखाना हा गोरगरीबा साठी उपयोगाचा आहे का ?हा पण एक प्रश्नच आहे

प्रशांत भोरे यास सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी डॉ. युवराज खराडे यांच्या मदतीने अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये महेश मोहोळकर १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने पाठवण्यात आले आहे त्याला तिथे ताबडतोब इलाज चालू झाले आहेत

तसेच ग्रामीण रुग्णालय सरकारी दवाखाना हा सकाळी ९=०० वाजता उघडतो आणि १२=०० वाजता सुट्टी होते त्यानंतर गोरगरीब खेड्यातील शेतकरी आलेल्यांना दुपारी ४=०० वाजेपर्यंत ताटकळत बसावे लागते म्हणून त्यांना वेळ वाढवून औषध उपचार करावे

या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.