माजी आ.भीमराव धोंडे यांंच्या समर्थकांनी ३९ ग्रा.पं.वर मारली बाजी
युवानेते अजय धोंडे यांंच्या कौशल्याने सुयश
आष्टी (प्रतिनिधी)
भाजपचे नेते माजी आ.भीमराव धोंडे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीतमतदार संघातील तरुण होतकरु युवकांना संधी दिल्याने चांगले यश प्राप्त केलेले आहे. युवानेते अजय धोंडे यांंच्या कौशल्याने आणि नियोजनाचा निकालावर चांगला परिणाम झाला आहे. आष्टी तालुक्यातील सुमारे १०० ग्रामपंचायतीपैकी ४० ग्रामपंचायतवर माजी आ.भीमराव धोंडे यांंच्या समर्थकांनी झेंडा फडकविला आहे.माजी आ.धोंडे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत लक्ष दिल्याने इतर राजकीय नेत्यांनाही प्रतिष्ठा पणाला लावावी लागली होती.अनेक ग्रामपंचायतीमध्ये मा.आ.
भीमराव धोंडे आ.सुरेश धस आमने-सामने सामने निवडणुकीच्या मैदानात उतरले तर काही ठिकाणी संमिश्र तर काही ठिकाणी आ.बाळासाहेब आजबे गट संमिश्र निवडणूक लढले. माजी आ.भीमराव धोंडे यांनी ३९ ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवला आहे.तर संमिश्र ३० ते ४० ग्रामपंचायत वर वर्चस्व मिळविले आहे.मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायत ताब्यात घेण्यात युवानेते अजय धोंडे यांचे योगदान महत्त्वाचे आहे.धोंडे पिता-पुत्राने झंझावात प्रचार करत प्रत्यक्ष मतदारांना भेटून निवडणुकीत प्रचार केल्याने ४० ग्रामपंचायतवर वर्चस्व मिळविले आहे.या निवडणुकीत युवानेते अजय धोंडे यांंच्या प्रचार वा गाठीभेटीची चर्चा वाढली होती. ग्रामपंचायत निवडणुक विजयाचा आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीत तरुणवर्गाचा धोंडे गटाला नक्कीच फायदा होणार आहे.या निवडणुकीच्या विजयावरून पुढची रणनीती ठरणार आहे.आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आ.भीमराव धोंडे हे मागिल नगरपंचायत निवडणुकीत अलिप्त राहिले होते.त्यानंतर झालेल्या दि.१८ डिसेंबर रोजी १०९ ग्रामपंचायतीमध्ये सहभाग घेत पॅनलची बांधणी करुन प्रचारात जोरदार मुसंडी मारली.यामध्ये युवा नेते अजय धोंडे यांनी ही गावागावात जाऊन प्रचार करत जोरदार मुसंडी मारत ३९ ग्रामपंचायत ताब्यात घेत विजय मिळवला आहे.धोंडे गटाने ३९ ग्रामपंचायतीवर ताबा मिळवला आहे. संमिश्र ३० ते ४० ग्रामपंचायतवर वर्चस्व मिळविले असल्याचा दावा केला आहे.युवानेते अजय धोंडे यांनी राजकारणात चांगलीच पकड निर्माण केली आहे.तरुणांच्या वाढत्या पाठिंब्याने धोंडे गट मजबूत होत आहे.
stay connected