हातोळण च्या सरपंचपदी 21 वर्षीय तरुणी भारती बाळासाहेब मिसाळ विजयी
हातोळण ग्रामपंचायत 2022 निवडणुकीत भारती बाळासाहेब मिसाळ महाराष्ट्रातील अवघ्या 21 वर्षे वयाची तरुणी सरपंच पदी निवड झाली.
सदर तरुणी डॉक्टर शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय बारामती येथे कृषी पदविका शिक्षण घेत आहे तिचे वडील बाळासाहेब मिसाळ पाटील सामाजिक कार्यकर्ते असून राज्यांमध्ये छत्रपती क्रांती सेना या संघटनेचे अध्यक्ष आहेत सोबतच विविध परिवर्तनवादी चळवळीत ते काम करत आहेत घरात एकूणच प्रगतशील विचाराचा वारसा आहे महाराष्ट्रात सर्वात कमी वयाची तरुणी सरपंच पदी निवड होण्याचा बहुमान तिला मिळत आहे सदर तरुणीचे विविध स्तरातून स्वागत होत आहे सदर तरुणीने गाव विकासाचा एक जाहीरनामा लोकांकडे दिला होता. ग्रामपंचायत चा कारभार पारदर्शक चालवणे गावातील गौण खनिजाचे रक्षण करणे महिला शक्ती करण्यासाठी उपक्रम राबवणे तसेच विविध घटकांसाठी येणाऱ्या निधी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा जाहीरनामा सदर तरुणीने दिलेला आहे गावातील सर्व मतदारांनी या तरुणीवर विश्वास टाकून तिला बहुमताने निवडून आणले आहे
stay connected