*दोस्ती फाउंडेशनच्या लोककलावंत पै.मजनुभाई शेख पुरस्कारासाठी प्रस्ताव/पुस्तके पाठवा*

 *दोस्ती फाउंडेशनच्या लोककलावंत पै.मजनुभाई शेख पुरस्कारासाठी प्रस्ताव/पुस्तके पाठवा*



 श्रीरामपूर येथील दोस्ती फाउंडेशनच्या वतीने ग्रामीण लोककलावंत पै.मजनूभाई शेख यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. जुन्या पिढीतील लोककलावंत पै.मजनुभाई शेख हे नाट्यकलावंत ,उत्कृष्ट हार्मोनियम वादक ,गौळणरचिताकार तसेच उत्कृष्ट गायक होते. त्यांच्या स्मृतीस उजाळा देण्यासाठी दोस्ती फाउंडेशनतर्फे सदर पुरस्कार देऊन विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांस प्रोत्साहन देण्याचे ठरवले आहे. यासाठी उत्कृष्ट प्रवासवर्णन, उत्कृष्ट गझलसंग्रह, उत्कृष्ट सुविचार संग्रह,उत्कृष्ट चारोळीसंग्रह, उत्कृष्ट लेखसंग्रह, उत्कृष्ट कादंबरी ,उत्कृष्ट काव्यसंग्रह आणि उत्कृष्ट कथासंग्रह यांना प्रत्येकी एक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.यासाठी  लेखक कवींनी मागील चार वर्षात प्रकाशित पुस्तकाच्या दोन प्रती पाठवून द्याव्यात. तसेच कला,क्रीडा,साहित्य,वैद्यकीय,शिक्षण, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. पुरस्कृत पुस्तकास आणि व्यक्तीस आकर्षक सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. तरी आपण आपले प्रस्ताव व पुस्तके श्री. रज्जाकभाई शेख, अध्यक्ष दोस्ती फाउंडेशन ,फातेमा हौसिंग सोसायटी,वॉर्ड क्र.१ श्रीरामपूर ता.श्रीरामपूर जि. अहमदनगर या पत्यावर पोष्टाने किंवा कुरियरमार्फत २० नोव्हेंबर २०२२ पर्यंत  पाठवून सहकार्य करावे. असे आवाहन रज्जाकभाई शेख, नितीन गायके,नसीर सय्यद, देविदास बुधवंत, सत्तारभाई शेख,आनंदा साळवे,इमाम सय्यद,अमोलभाऊ शिंदे,मिराबक्ष बागवान आणि रजा इ इलाही ग्रुपच्या सदस्यांनी केले आहे. दुसऱ्या सत्रात कविसंमेलन होणार आहे नावनोंदणीसाठी ९६६५७७८५५८/८६६९०२९५७३ या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन दोस्ती फाउंडेशनच्या वतीने केले आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.