पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची कारवाई,४६ लाखाचा गांजा जप्त एकास अटक

 पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची कारवाई,४६ लाखाचा गांजा जप्त एकास अटक



   पाचोरा:(शाह एजाज़ गुलाब)

सावखेडा येथे एकाच्या शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसांना मिळाली. पोलिसांनी संबंधित आरोपी सुभाष पाटील याच्या शेतात धाड टाकत सुमारे २०० गांज्याच्या झाडे जप्त केली. यादरम्यान घटनास्थळावरुन सुमारे ४६ लाख ४८ हजार रूपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला. तसेच आरोपी सुभाष पाटील यांचेविरुद्ध एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सुभाष पाटील यास अटक करण्यात आली आहे.

   याबाबत सविस्तर वृत्त असे की, सावखेडा ता. पाचोरा येथील रहिवाशी सुभाष बाबुराव पाटील यांची सावखेडा येथे शेत गट क्रं. ६१/१ ही जमिन आहे. मागील १५ वर्षांपासून सुभाष पाटील हे मुंबई येथे खाजगी वाहनावर चालक म्हणुन काम करत होते. मात्र गेल्या काही वर्षांपुर्वी ते सावखेडा गावी येवुन शेती करु लागले.

   आरोपीस गांजाची लत...

    दरम्यान सुभाष पाटील यांना गांजा घेण्याची लत लागली होती. त्यासाठी सुभाष पाटील यांनी सुरुवातीला आपल्या शेतातच कमी प्रमाणात गांजाची लागवड सुरू केली. कालांतराने सुभाष पाटील यांनी गांजाची लागवड वाढवली. दरम्यान गांजाच्या शेतीवर फवारणी करण्यासाठी असलेल्या मजुराने गांजा शेतीचा फोटो काढुन पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसांना पाठविला. सुभाष पाटील व पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसात प्रकरण दडपण्यासाठी ७५ हजार रुपयांची आनलाईन पद्धतीने देवाण घेवाण झाल्याची परिसरात चर्चा आहे. अखेर दि. २३ नोव्हेंबर रोजी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसांनी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलिस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी भारत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक महेंद्र वाघमारे, पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार, पोलिस हवालदार रणजित पाटील, पोलिस, नाईक अरुण राजपूत, शिवनारायण देशमुख, सचिन वाघ, पोलिस शिरस्तेदार संदीप राजपूत, अभिजित निकम, दिपक सोनावणे, प्रमोद वाडीले, अमोल पाटील, उज्वल जाधव, विकास पवार या पथकाने केली. दरम्यान घटनास्थळी निवासी नायब तहसिलदार संभाजी पाटील, पोलिस पाटील प्रविण परदेशी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.