कसदार काव्यनिर्मितीमधे पहायला मिळते प्रतिभावंताची जीवन प्रणाली डाॅ.मधुसूदन घाणेकर

 कसदार  काव्यनिर्मितीमधे पहायला मिळते प्रतिभावंताची जीवन प्रणाली 
           डाॅ.मधुसूदन घाणेकर 




पुणे : 27 नोव्हेंबर 2022 : " कुठल्याही कसदार काव्यनिर्मितीमधे

प्रतिभावंताची चिंतनशील जीवन कार्यप्रणाली पहायला मिळते.शाश्वत

काव्यनिर्मितीसाठी त्याच्या साधनेचे

योगदान पहायला मिळते.

आपली कविता अधिक समाजपरिवर्तनक्षम ठरण्यासाठी 

प्रतिभावंतांनी सामाजिक समरसतेचेही तितकेच योगदान देण्यात प्रयत्नशील राहिले पाहिजे.

समाजाची सुखदुःख..जाणिवा..

जाणून घेत राहिले पाहिजे जेणेकरून 

समाजाला यशस्वी जीवन वाटचालीसाठी आत्मज्ञान प्राप्त होईल..सभोवतालच्या विश्वातील वास्तवाचा अचूक वेध घेण्याकरीता

व्यापक पातळींवर सातत्याने व्यासंगाने जतन करायला हवे .

प्रतिभावंतांनी काव्याच्या फाॅर्मच्या

मागे न लागता प्रगल्भ आशयावर

आपली मनाची एकाग्रता वाढवावी."

असे प्रतिपादन  ज्येष्ठ कवी, आंतरराष्ट्रीय विचारवंत आणि पहिल्या विश्व काव्य संमेलनाचे अध्यक्ष डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी केले.

संकल्प चॅरिटेबल फौंडेशन, समाज

प्रबोधन चॅरिटेबल चॅरिटेबल ट्रस्ट आणि वुमन्स लिबर्टी चॅरिटेबल ट्रस्ट 

यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 

केलेल्या विशेष काव्यसंमेलनात

डाॅ.मधुसूदन घाणेकर आपल्या प्रमुख 

मार्गदर्शनपर भाषणात बोलत होते.

याप्रसंगी समारंभ अध्यक्ष जयराम फगरे,डाॅ.न.म.जोशी, सतीश इंदापूर , संजय भारद्वाज यांचीही मार्गदर्शनपर

भाषणे झाली. जयंत हिरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन आणि प्रास्ताविक केले. रुपाली वांबुरे यांनी

आभार मानले. संजय हिरवे यांनी सूत्रसंचालन केले. 

कार्यक्रमाच्या समारोपात मान्यवरांच्या शुभहस्ते काव्यस्पर्धेतील विजेत्यांचे 

पुरस्कार वितरीत करणार आले.

       काव्यस्पर्धेतील विजेते

       ---------------------------


               प्रथम क्रमांक 

         जयश्री देशकुलकर्णी


                द्वितीय क्रमांक 

              श्रीनिवास गडकरी


                तृतीय क्रमांक

               योगिता कोठेकर

------------   उत्तेजनार्थ

              आम्रपाली धेंडे

               प्रिया दामले


--------------




-----------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.