*राष्ट्ररत्न राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे राष्ट्रसेवा सेवकाचा सन्मान : डॉ. रवींद्र भोळे अध्यक्ष,मणिभाई ट्रस्ट पुणे*
आम्रपाली साबळे धेंडे
*प्राचार्य डॉ पंढरीनाथ शेळके सन्मानित*
. दि. 31आकटोबर 2022 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणे येथे राष्ट्रकार्यासाठी, समाजाच्या उत्थानासाठी विविध सामाजिक क्षेत्रामध्ये जे जे समाजसेवक कार्य करतात त्यांचा गौरव डॉ. मणिभाई देसाई मानवसेवा ट्रस्ट उरळी कांचन पुणे, चे अध्यक्ष डॉ. रवींद्र भोळे यांचे हस्ते सर्व समाजसेवकांचा सन्मानचिन्ह मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संजय देशमुख राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ ,डॉ. अशोक पाटील उपाध्यक्ष डॉ. मणिभाई देसाई मानवसेवा ट्रस्ट ,डॉ राजेंद्र चौधरी अध्यक्ष एल सी सी आय पुणे, श्री सुभाष कट्यारमल दिव्यांग सेवक पुणे,श्री गंगाधर पाटील से. नि. ए.सी.पी. महाराष्ट्र शासन व अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते.
भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त जे समाजसेवक मानव राष्ट्र कल्याणाची कार्य करतात, त्यांना प्रेरणा म्हणून डॉ मणिभाई देसाई मानवसेवा ट्रस्ट पुणे कडून दरवर्षी सन्मानित केल्या जाते.
सन २०२२ ला हा राष्ट्रीय सन्मान मिळण्याचे भाग्य प्राचार्य डॉ पंढरीनाथ शेळके हिवरा आश्रम बुलडाणा यांना लाभले.
प्राचार्य डॉ शेळके हे गेल्या ४०वर्षापासून राष्ट्रीय कार्य, सामाजिक कार्य,मानवतावादी कार्य करीत आहे.व्यसन मुक्ती,सामूहिक विवाह, कोरोणा महामारीत कोरोनायोद्धा म्हणून ,राष्ट्रीय एकात्मता, वृक्ष लागवड संवर्धन आणि राष्ट्रीय कार्याचे प्रबोधन,जागृती कार्य अव्यहरत पणे सुरू आहे विवेकानंद आश्रम हिवरा स्वामी शुकदास महाराज सेवेत ही अखंड पणे कार्यरत aahet सर्व सेवा कार्याची दखल म्हणून आंतर राष्ट्रीय पुरस्कार,मानद डॉक्टरेट प्राप्त झाली. या कार्याची दखल पुढे डॉ. मणीभाई देसाई ट्रस्ट ने घेवून *भारत रत्न सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्र रत्न राष्ट्रीय पुरस्कार* देवून सन्मान केला आहे.
पुरस्कार वितरण प्रसंगी आयोजक तथा डॉ मणीभाई ट्रस्ट चे अध्यक्ष डॉ रविंद्र भोळे यांनी भारत रत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन केले.त्याच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.तसेच पुरस्कार स्वीकारल्या बद्दल पुरस्कार प्राप्त सर्वांचे आभार व्यक्त केले.तसेच सर्व पुरस्कार समाज सेवकांचे अभिनंदन केले.
stay connected