' नाट्यवाचन कार्यशाळा संपन्न '
मातृभाषा अध्यापक संघ', पुणे.आणि 'माझं पुणं सुंदर पुणं'.यांच्या संयुक्त विद्यमाने नाट्यवाचन कार्यशाळा दि.३० जुलै२०२२ शनिवार रोजी सकाळी ११: ०० वाजता आयोजित करण्यात आली.
नटराज पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.यावेळी कुमारी कोशंबिका जोशी हिने प्रार्थना सादर केली.प्रास्ताविक श्री .पढेर सर यांनी केले.मातृभाषा अध्यापक संघाच्या अध्यक्षा सौ.स्मिता ओव्हाळ यांनी संघाची माहिती सांगितली. इथून मागे संघामार्फत जे जे उपक्रम राबविले गेले आणि यापुढे भविष्यात राबविण्यात येणार आहेत याविषयी माहिती दिली.सौ.वंदना आणेकर यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले व पाहुण्यांचा परिचय करून दिला.पटकथा लेखक सन्मा.मिलिंद गाडगीळ प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. सन्मा.'माझं पुणं सुंदर पुणं,'संस्थेचेअध्यक्ष सन्मा.योगेश गोगावले. ज्यांना अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत यांनी 'माझं पुणं सुंदर पुणं'या संस्थेचा परिचय करून दिला.मातृभाषेचे जतन व संवर्धन करण्यासाठी अनेक उपक्रम राबविणे गरजेचे आहे.नाट्यवाचन हा त्यातील एक उत्तम उपक्रम आहे. तसेच संस्थेमार्फत त्रैमासिक काढले जाते त्याविषयी उपस्थितांना माहिती दिली.लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांवर जे परिणाम झाले.एकूणच शिक्षणक्षेत्रावर जे परिणाम झाले यावर त्यांनी आपले विचार व्यक्त केले.माणसाला सर्वसामान्य ज्ञान असणे किती आवश्यक आहे.याविषयी त्यांनी काही किस्से सांगितले.'मातृभाषा अध्यापक संघ' व 'माझं पुणं सुंदर पुणं' च्या माध्यमातून आपण मराठी भाषेसाठी एक चळवळ उभी करूयात अशी प्रेरणा त्यांनी दिली.डॉ.मिलिंद गाडगीळ यांनी मार्गदर्शन करताना.'नाट्यवाचनासाठी कार्यशाळा' या विषयावर माझ्या माहितीप्रमाणे हा पहिलाच प्रयोग आहे.त्याबद्दल संघाचे व त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक घटकाचे अभिनंदन केले.
नाटक ही ६४ कलांमधील श्रेष्ठ कला आहे.बाराखडी मोठ्याने म्हणावी.विरामचिन्हांचा योग्य अर्थ लक्षात घेऊन वाचन करावे.वाचनाच्या आधी एक तास मुलांनी खाल्लेले असावे.सैलसर कपडे असावेत.हात न हालवता वाचन करावे.नाट्यवाचनापूर्वी स्थल,काल व प्रसंग याविषयी माहिती द्यावी.मा.घोटकर सर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, एखादा विद्यार्थी ऐन वेळी अनुपस्थित राहिला तर ज्याला कोणतंही पात्र वाचता येईल असा विद्यार्थी तयार ठेवावा.मा.घोरपडे सर यांनी श्रीराम लागू यांचे 'वाचिक अभिनय'हे पुस्तक मार्गदर्शक म्हणून वापरावे असे सांगितले.नाटक व्यावहारिक जगाशी जोडलेलं असावं.वाचनाने माणूस घडतो.नाट्यवाचन बसवताना शिक्षकांची ही प्रगल्भता वाढते.नाट्यवाचनात सहभागी होताना आनंद घेत सहभागी व्हावे. श्री .पढेर सर यांनी प्रशिक्षण व प्रशिक्षण संस्था यांचे महत्त्व विशद केले.मार्गदर्शक श्री .हनुमंत कुबडे यांनी पाठावर आधारित नाट्यवाचन करता येईल असे मत व्यक्त केले.
सचिव सौ .संध्या माने यांनी आभार मानले.त्यानंतर अभिनव विद्यालयातील विद्यार्थीनींनी नाट्यवाचनाचे प्रात्यक्षिक सादर केले.सौ.वंदना आणेकर यांनी त्यांना मार्गदर्शन केले. सौ . हेमलता भूमकर. सौ .शारदा पानगे.सौ. शामला पंडित . सौ .निलम गीताभारती ,सौ .सुरेखा लेंबे, सौ . सुरेखा सोनवणे, सौ . मंगल निफाडकर या मातृभाषा अध्यापक संघांच्या सदस्यांनी सहभाग नोंदविला . नाटयवाचन स्पर्धा पुढील महिन्यात आहेत . त्यासाठी स्पर्धा पूर्व योग्य मार्गदर्शन लाभले यासाठी उपस्थितांनी समाधान व्यक्त केले . नाट्यवाचनासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना या कार्यशाळेचे आयोजन उद्बोधक ठरेल असे समाधान उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केले.


stay connected