आंतराष्ट्रीय परिषदेच्या अध्यक्षपदी डाॅ.मधुसूदन घाणेकर

 आंतराष्ट्रीय परिषदेच्या अध्यक्षपदी डाॅ.मधुसूदन घाणेकर 



भोसरी : 26 जुलै 2022

विश्वशांती प्रतिष्ठान, आळंदी

संस्थेतर्फे, रविवार दि.31जुलै

2022 रोजी सायंकाळी 5 वाजता पहिली आंतरराष्ट्रीय एकात्मता मानववाद ऑनलाईन 

परिषद आयोजित करण्यात आली असून, या परिषदेच्या अध्यक्षीयपदी आंतराष्ट्रीय कीर्तिचे विचारवंत, विश्वमहात्मा,

सर डाॅ.मधुसूदन घाणेकर यांची

निवड केली असल्याचे, विश्वशांती प्रतिष्ठानचे संस्थापक 

अशोकजी पवार यांनी कळवले

आहे.ज्येष्ठ साहित्यिक, कलावंत 

सौ.कांचन प्रकाश संगीत यांच्या

शुभहस्ते परिषदेचे उद्घाटन केले

जाणार आहे.या परिषदेत राष्ट्रीय व्हिल चेअर बास्केटबॉल चॅम्पियन-कोमल माळी(क्रिडा आणि एकात्मता) , महिला ज्योतिर्विद संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा -डाॅ.सविता महाडिक (ज्योतिष आणि एकात्मता मानववाद), भारत विकास परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रमोद प्रभू (सामाजिक क्षेत्र आणि एकात्मता मानववाद) यांचे मौलिक विचार ऐकायला मिळणार आहेत.

परिषदेचे औचित्य साधून घेण्यात येणा-या निमंत्रितांच्या

काव्यसंमेलनात प्रा.नागेश हुलावळे, प्रिन्सिपल प्रिती दबडे,

योगिता पाखले,तनुजा प्रधान,  ऋचा थत्ते, ऋचा कर्वे,सरिता कलढोणे,आणि अनुष्का गोवेकर सहभागी होणार आहेत.

सुमन बोरकर तसेच आम्रपाली धेंडे यांचाही परिषदेत महत्त्वपूर्ण 

सहभाग असणार आहे. अक्षरआनंद इंटरनॅशनलचे संस्थापक-अध्यक्ष डाॅ.योगेश जोशी हे या परिषदेचे अध्यक्षपद 

भूषविणार आहेत. डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित डहाळी विशेषांक देखिल प्रकाशित केला जाणार आहे. समारोपात 

परिषद अध्यक्ष डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते मान्यवरांना विशेष पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. 

  डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी

भारतासह 17 देशात विश्वजोडो

अभियान राबविले असून ते

ब्रह्मध्यान विश्वपीठ तसेच हास्य

विश्वपीठाचे संस्थापक अध्यक्ष 

आहेत. डाॅ.घाणेकर यांच्या एकपात्री.कार्यक्रमाच्या

दैदीप्यमान वाटचालीस नुकतीच 

60 वर्ष पूर्ण झाली असून साहित्य, लघुपट,  अनुबोधपट, 

शीळवादन, गायन,  संपादन, 

हस्ताक्षर मनोविश्लेषण,  ज्योतिष, व्यंगचित्र  आदि विविध क्षेत्रांसाठी त्यांच्या नावावर 250 विश्वविक्रम आहेत.150 हून अधिक आंतरराष्ट्रीय परिषदा आणि

साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद 

डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी भूषविले आहेत. विश्वजोडो

अभियानातील सातत्यपूर्ण योगदानासाठी त्यांना विश्वमहात्मा ह्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च उपाधिने

सन्मानित केले आहे.225 पुस्तके प्रकाशित झाली असून

विविध क्षेत्रांसाठी डाॅ. घाणेकर 

यांना आत्तापर्यंत 500 पुरस्कार 

प्राप्त झाले आहेत. 2016मधे 18.राष्ट्रीय.आंतरराष्ट्रीय संस्थांनी रेग्युलस ता-यास 

सर डाॅ.मधुसूदन घाणेकर रेग्युलस तारा हे नाव जाहिररित्या देण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर