*सलून व्यवसायिक बांधवांनो,**वर्षाला फक्त ३९९ भरा आणि मिळवा तब्बल १० लाखाचा अपघाती विमा....?**भारतीय टपाल खात्याचा अभिनव उपक्रम*
प्रतिनिधी : संजय पंडित
*...भारतीय टपाल खाते अगदी स्वस्तात विमा कवच पुरविणार आहे. अवघ्या २९९ आणि ३९९ च्या वार्षिक हप्त्यामध्ये विमाधारकास १० लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे.*
भारतीय टपाल खाते आणि टाटा एआयजी विमा कंपनीने विमा क्षेत्रात क्रांतीकारक योजना आणली आहे. अवघ्या २९९ आणि ३९९ च्या वार्षिक हप्त्यामध्ये विमाधारकास १० लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे. टपाल खात्याच्या या अभिनव योजनेचा देशातील गरिब आणि मध्यम वर्गासाठी मोठा फायदा होणार आहे. हा मोठा वर्ग आतापर्यंत स्वस्तातील विमा योजनेच्या प्रतिक्षेत होता. या विमा योजनेला टपाल खात्याची विश्वासहर्यता उपयोगी पडणार आहे. वर्षभरात या योजनेचे विमा संरक्षण विमाधारकाला प्राप्त होईल.
पोस्ट ऑफिसमध्ये या विमा योजना अंतर्गत तुम्हाला विम्याची रक्कम ही वार्षिक भरायची आहे. याचा अर्थ असा की, तुम्हाला वर्षभरात एकदाच २९९ किंवा ३९९ रुपये भरायचे आहेत. त्या बदल्यात तुम्हाला वर्ष भरासाठी सुमारे १० लाख रुपयांचे सुरक्षा कवच मिळणार आहे. एक वर्षानंतर पुढील वर्षासाठी योजना सुरू ठेवण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन नूतनीकरण करायचे आहे. त्यानंतर पुन्हा एक वर्षासाठी पघात विमा संरक्षण प्रदान करण्यात येईल.
ही योजना १८ ते ६५ वयांतील व्यक्तींसाठी आहे या योजनेचा फायदा जास्तीत जास्त लोकांना होण्यासाठी प्रत्येक टपाल कार्यालयातंर्गत व्यापक प्रचार मोहीम राबविण्यात येणार आहे. ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी टपाल खाते आणि टाटा एआयजी विमा कंपनीत सामंजस्य करार करण्यात आला आहे. ही योजना प्रत्येक टपाल कार्यालयातंर्गत अटी व शर्तींसह तुम्हाला विमा संरक्षण देईल.
या योजनेत व्यक्तीला अवघ्या २९९ किंवा ३९९ रुपयांच्या हप्तामध्ये एका वर्षात १० लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळवू शकते. यामध्ये विमाधारकाचा अपघाती मृत्यू अपंगत्व किंवा कायमचे आंशिक अपंगत्व असल्यास १० लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण दिले जाईल. याशिवाय या विम्यामध्ये रुग्णालयात दाखल झाल्यास ६० हजार रुपयांपर्यंतचा खर्च आणि रुग्णालयात दाखल न होता घरी उपचार घेतल्यास ३० हजार रुपयांपर्यंतचा दावाही दाखल करता येईल.त्याचबरोबर य रुग्णालयाच्या खर्चासाठी १० दिवस तुम्हाला प्रति दिन एक हजार रुपये देखील मिळतील. कुटुंबाला वाहतुकीसाठी २५ हजार रुपयांपर्यंतचा खर्चदेखील मिळणार आहे. कोणत्याही कारणाने अपघातात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अंतिम संस्कारासाठी ५ हजार रुपये व या विम्यांतर्गत किमान दोन मुलांच्या शिक्षणासाठी १ लाख रुपयांपर्यतची रक्कम देण्यात येणार आहे.
वरील विमा योजनेचे महत्व समजून घेऊन सर्व सलून आणि ब्युटी पार्लर व्यवसायिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रीय जनसेवा पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे.



stay connected