*कर्जत : कर्जत तालुक्यातील १० पंचायत समिती गणासाठी गुरुवारी आरक्षण सोडत संपन्न*

 *कर्जत : कर्जत तालुक्यातील १० पंचायत समिती गणासाठी गुरुवारी आरक्षण सोडत संपन्न*

कर्जत प्रतिनिधी : दि २८


              कर्जत पंचायत समितीच्या १० गणासाठी प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली आरक्षण सोडत संपन्न झाली. यामध्ये १ अनुसूचित जाती महिला, १ नामाप्र महिला तर सर्वसाधारण महिलेसाठी ३ गण आणि सर्वसाधारण जागेसाठी ४ असे आरक्षण जाहीर झाले आहे. या आरक्षण सोडतीने अनेक राजकीय गणिते जुळविण्याची प्रक्रिया सर्व राजकीय पक्षात सुरू झाली आहे. सर्वच गणात इच्छुकांची भाऊगर्दी पहावयास मिळेल. 

           कर्जत पंचायत समितीच्या १० गणासाठी गुरुवार, दि २८ रोजी कर्जत तहसील कार्यालयाच्या सभागृहात सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या निर्देशानुसार प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली आरक्षण सोडत संपन्न झाली. गणनिहाय आरक्षण सोडत पुढीलप्रमाणे :  निमगाव गांगर्डा - सर्वसाधारण महिला, मिरजगाव - सर्वसाधारण महिला, चापडगाव - सर्वसाधारण, टाकळी खंडेश्वरी - सर्वसाधारण महिला, कोरेगाव - सर्वसाधारण, आळसुंदे - नामाप्र स्त्री, कुळधरण - अनुसूचित जाती महिला, बारडगाव सुद्रीक - सर्वसाधारण, राशीन - सर्वसाधारण आणि भांबोरा नामाप्र असे आरक्षण सोडत संपन्न झाली असल्याची माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिली आहे. यावेळी नायब तहसीलदार सुरेश वाघचौरे, निवासी नायब तहसीलदार प्रकाश बुरुंगले यांच्यासह राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर