आष्टी तालुक्यातील क-हेवडगांव मध्ये रंगला संत शिरोमणी सावता महाराजांचा पुण्यतिथी सोहळा
आष्टी तालुक्यातील क-हेवडगांव मध्ये श्री संत शिरोमणी सावता महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा उत्साहात पार पाडला या सोहळ्याची शोभायात्रा आकर्षक ठरली सजवलेले बैल व गाडी लक्ष वेधून घेत होते. भजनी मंडळींनी भजन गायले
सावतामाळी कि जय.. च्या घोषणेने आसमंत दणानून गेला होता.भक्तीमय वातावरणातील सोहळा पाहण्यासाठी शेकडो भक्त सामिल झाले होते.
आष्टी तालुक्यातील क-हेवडगांव येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजिवनी समाधी सोहळ्यानिमित्त दि. २७ जूलै रोजी शोभायात्रेसह महाप्रसादाने सांगता करण्यात आली. या शोभायात्रेत शेकडो नागरिकांनी भजन, अभंग म्हणत वाजतगाजत फटाक्यांची आतिषबाजी करत समाजबांधवांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.भक्तीमय वातावरणात पुण्यतिथी सोहळा संपन्न झाला सावतामाळी कि जय.. च्या घोषणेने आसमंत दणानून गेला होता.भजन,सावता महाराजांचे अभंग,टाळमृदुगाच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजी ने संपूर्ण गावातून भव्य दिव्य शोभायात्रेत भजन, अभंग म्हणत वाजतगाजत समाजबांधवांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. १० च्या नंतर भजन व ११.४५ वाजता संत शिरोमणी सावता महाराज यांच्या प्रतिमेवर फुले टाकण्याचा कार्यक्रम पार पडला त्यानंर शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी गावातील जेष्ठ नागरीक, राजकीय, सामाजिक,शेक्षणिक,आजी माजी सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य,सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाची जय्यत तयारी सावता प्रतिष्ठाण च्या वतीने करण्यात आली होती.


stay connected