कर्जमाफीच्या नोटीसा बजावण्याचे थांबवा नसता उपोषणाचा इशारा रवि काका ढोबळे -----------------
कडा महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी देण्याचे जाहीर केले असून त्याची अंमलबजावणी सुरू असताना देखील शासनाकडे कर्जमाफी यादी पाठवणे ऐवजी शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा हेतूने एसबीआय बँक व महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा आष्टी चे शाखा व्यवस्थापक नोटीस बजावत आहेत या प्रकरणी उपोषणास बसणार असल्याचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे . नोटिश्याच्या नैराश्यातुन जर शेतकऱ्यांच्या आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलले तर ते मनुष्यवधाच्या गुन्ह्याला जबाबदार ठरतील शेतकऱ्यांना नोटीस बजावण्याचे त्वरित थांबवण्यासाठी एसबीआय व महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापकास आदेशित करावे नसता आपल्या बँकेसमोर लक्षणीय उपोषण करण्यात येईल असे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष रवी काका ढोबळे यांनी दिले त्यांच्या समवेत लालासाहेब शिंदे काकासाहेब कर्डिले दादासाहेब पांडुळे वसंतराव चव्हाण उपस्थित होते .


stay connected