आष्टी तालुक्यात पाणी फौंडेशन ने क्रांती घडवून आणली आहे,२०१८ मध्ये राज्यस्तरीय तृतीय बक्षिस ,नंतर २०१९ मध्ये तालुक्यातील बक्षिस पटकावून,आष्टी तालुका दुष्काळ मुक्त करून २०२१-२२ मध्ये टप्पा क्रमांक २ समृद्ध गावस्पर्धा यशस्वी पणे पार पाडून आता टप्पा क्रमांक ३ म्हणजे "फार्मर कप" चा बिगुल वाजला आहे,या स्पर्धे साठी आष्टी तालुका पुन्हा एकदा सज्ज झाला आहे,राज्यस्तरीय फार्मर कप आपल्या आष्टी तालुक्याला भेटाव व आपली शेती समृद्ध करून गाव तसेच आपला तालुका समृद्ध व्हावा यासाठी आज पन्हाळकर सर तालुका समन्वयक आष्टी यांच्या नेतृत्वाखाली समृद्ध गाव स्पर्धा अंतर्गत "फार्मर कप" प्रशिक्षण घेण्यासाठी राळेगणसिद्धी या ठिकाणी पांगुळगव्हाण,कासेवाडी,करंजी,शेरी बु,खाकाळवाडी,आनंदवाडी,सराटेवडगाव,कानडी बु,लोखंडवाडी,टाकळिआमिया,पिंपळगाव या गावातील सरपंच,उपसरपंच, सदस्य,ग्रामस्थ तसेच महिला २ दिवशीय प्रशिक्षण घेण्यासाठी चालले आहे.
आज पहिली बॅच तालुक्यातुन जात असताना शुभेच्छा देण्यासाठी आपल्या तालुक्याचे लाडके ता .कृषी अधिकारी तरटे साहेब ,आत्मा प्रमुख धोंडे साहेब ,सरपंच मा.प्रा.डाॅ राम बोडखे सर,मा.संदीप साहेब खाकाळ,मा.दीपक खिळे,प्रा.बाळासाहेब धोंडे,मा.आण्णासाहेब चौधरी,दीपक सोनवणे,भारत भाऊ खिळे,देवदस थोराथ,प्रा.अजहर सर,सुनिलजी सानप, लक्ष्मन बुकन ,दीपक गिते,अशोक गिते,सुनिल शिंदे,अजिनाथ थोरात,सखाराय ससाने व सर्व प्रशिक्षणास येणारे जलमित्र होते .
stay connected