साकळाई मेडिकल अँड जनरल स्टोअर्स चे तहसीलदार वैभव फरतारे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न
----------------------------------------
आष्टी (प्रतिनिधी):आष्टी तालुक्यातील वाहिरा येथे साकळाई मेडिकल अँड जनरल स्टोअर्स चे उद्घाटन तिवसा तालुक्याचे तहसीलदार वैभव फरतारे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी प्राध्यापक दादासाहेब झांजे, सरपंच पती रतन फरतारे, माजी सरपंच गंगाधर आटोळे, उपसरपंच सतीषआटोळे, पोलीस पाटील शिवाजी झांजे, पै. भाऊसाहेब झांजे, माऊली दूध संघाचे चेअरमन रवि फरतारे, शिवाजी आटोळे, डॉक्टर लाळगे, पत्रकार सोपान पगारे, दगडू शेख, ग्रामपंचायत सदस्य नितीन झांजे, डॉ. नवनाथ जोगदंड, आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सरपंच पती रतन फरतारे म्हणाले संत शिरोमणी शेख महंमद महाराजांच्या कृपेने आज वाहिरा येथे वैद्यकीय क्षेत्राची तुमच्या माझ्या आरोग्य मानाची एक महत्त्वाची गोष्ट वाहिरा नगरीमध्ये आज घडत आहे. याचा आम्हा सर्व गावकरी बांधवांना आनंद होत आहे.
कारण प्रथमच गावामध्ये वैद्यकीय सेवा उपलब्ध होत आहे. कोरेगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर या गावचे सुपुत्र पुष्पक अशोक साबळे, हे स्वतः डी फार्म पदवीधर आहेत.
या परिस्थितीमध्ये त्यांनी असा निर्णय घेतला की आपल्या पंचक्रोशी मध्ये लोणी, पिंपळा, या दोन गावांच्या नंतर या गटात मध्ये मोठे गाव हे वाहिरा आहे, यामुळे साबळे यांनी वाहिरा येथे मेडिकल टाकण्याचा विचार केला.
आमच्या गावाला चांगली सुविधा द्यावी आम्ही गावकरी मिळून तुम्हाला कसलीच अडचण येऊ देनार नाही असे सरपंच पती रतन फरतारे म्हणाले..
stay connected