आष्टी येथील राष्ट्रवादी परिवार संवाद मेळाव्यास कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे . -शौकतभाई पठाण

 

आष्टी येथील राष्ट्रवादी परिवार संवाद मेळाव्यास कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे .
-शौकतभाई पठाण

अनिल मोरे / प्रतिनिधी कडा


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी परिवार संवाद कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष नामदार जयंतराव पाटील साहेब पालकमंत्री धनंजय मुंडे ,महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर ,प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे आ.बाळासाहेब आजबे (काका )आ. प्रकाश दादा सोळंके आ.संदीप भैया क्षिरसागर ,विधान परिषदेचे आ. संजय दौंड,माजी आ. साहेबराव दरेकर, बजरंग सोनवणे, जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आष्टी येथे शुक्रवार दिनांक ८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता परिवार संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यास आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व सेलचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी, बूथ कमिटी सदस्य यांच्यासह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्यांक चे जिल्हा सरचिटणीस शौकतभाई पठाण यांनी केले .

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार साहेब यांचे विचार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.ना.जयवंतराव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात कार्यकर्त्यांसाठी राष्ट्रवादी परिवार संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून शुक्रवार दिनांक ८ एप्रिल रोजी आष्टी येथील साई मंगल कार्यालयात आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या मार्गदर्शनाखाली नामदार जयंत पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी परिवार संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्यासाठी सामाजिक न्यायमंत्री तथा पालक मंत्री नामदार धनंजय मुंडे हेही उपस्थित राहणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विचार तळागाळातील व शेवटच्या कार्यकर्त्या पर्यंत पोहोचण्यासाठी या राष्ट्रवादी परिवार संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यातून राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी घराघरात कशी पोहोचता येईल यासाठी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात येणार आहे तरी आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे अल्पसंख्यांक सेल चे जिल्हा सरचिटणीस शौकतभाई पठाण यांनी केले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.