आज संपुर्ण देशात भारतीय जनता पार्टीचा विस्तार------आ.सुरेश धस
******************************
आष्टीत आ.सुरेश धस नेतृत्वाखाली भाजपा स्थापनादिनानिमित्त मोटार रॅली तर घोषणाने शहर दुमदुमले
*******************************
आष्टी (प्रतिनिधी)
१९५१ मध्ये जनसंघ आणि ६ एप्रिल १९८० ला भारतीय जनता पार्टी मध्ये रूपांतर करून पहिले अध्यक्ष म्हणून पूर्व प्रधानमंत्री श्रद्धेय अटलजी बिहारी वाजपेयी हे होते.भारतीय जनता पार्टीने अनेक चढउतार पाहिले आहेत.आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपुर्ण देशात भारतीय जनता पार्टीचा विस्तार झाला असल्याचे यावेळी भाजपा आ.सुरेश धस यांनी बोलताना सांगितले.
आष्टी येथे भारतीय जनता पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते.यावेळी
डॉ.शामाप्रसाद मुखर्जी,पं.दीनदयाळ उपाध्याय,माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी,माजी केंद्रीयमंत्री लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या प्रतिमेचे पुजन करुन शहरातून दुचाकी रॕलीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी भाजपाचे कार्यकर्ते,पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन घोषणांनी शहर दुमदुमून गेले.
यावेळी पुढे बोलताना आ.धस म्हणाले,
भारतीय जनता पार्टीचा आज ४३ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.सुरवातीच्या काळात अवघ्या दोन खासदारा पासून सुरू झालेली ही पार्टी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ३०० च्या वरती खासदार आहेत.संपूर्ण भारतात पार्टीचा विस्तार झाला असल्याचे शेवटी आ.धस यांनी सांगितले.
यावेळी व्हर्चुअल माध्यमातून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशवासियांना संबोधित केले.यामध्ये आ.सुरेश धस यांच्यासह भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले.
stay connected