संजय बियाणी यांच्या हत्येचा तीव्र निषेध ,गुंडाना फासावर लटकवा. - रमेशचंद्र बाहेती

 संजय बियाणी यांच्या  हत्येचा तीव्र निषेध ,गुंडाना फासावर लटकवा. - रमेशचंद्र बाहेती 



केज  (प्रतिनिधी) 


नांदेड  येथील थोर समाजसेवक, व्यापारी  संजय बियाणी यांची काल नांदेड  येथे गोळया घालुन हत्या करण्यात आली.

या प्रसंगी  तहसील  कार्यालयाच्या आवारात  बोलताना रमेशचंद्र बाहेती यांनी आपले मनोगत  व्यक्त  केले.

महाराष्ट्रात व्यापाऱ्या  वर भर दिवसा गुंड हल्ले करत आहे. गुंडाना कायदयाचा धाक राहीला नाही.

चांगली  माणसं गप्प आहेत म्हणून  गुंडाचे फोफावत आहे.

पुढे बोलताना बाहेती  म्हणाले  की एक संजय बियाणी  गेले  आज ऐका समाज  सेवकाची हत्या झाली म्हणून  कुणी बघ्याची भुमीका  घेऊ नका. कारण पुढील दिवस फार वाईट  आहेत.

संजय बियाणी  यांनी आठ दिवसा पुर्वी च 73 गरजूंना, गरीबांना घरे दिली होती.

नायब तहसीलदार आशा वाघ मॅडम यांनी निवेदन  स्विकारून शासनाला भावना कळवुत असे सांगितले. 


यावेळी अध्यक्ष रमेशचंद्र बाहेती ,  सचीव रामनिवास सोनी , चंद्रप्रकाश बियाणी , बालाप्रसाद इंदाणी , ओमप्रकाश भुतडा , ओमप्रकाश भन्साळी , रामेश्वर जाजु , गोविंद जाजु , दिलीप भुतडा , विष्णूदास जाजु , नारायण जाजु , प्रेमचंद सोनी , विशाल सोनी , संतोष तोष्णीवाल , राहूल संकलेचा , मनोज दरक , सतीश भराडीया , शिवप्रसाद सोनी , सचीन लोहिया , सतीष काकाणी , भगवानदास लोहिया , संतोष रिनवा , हरिभाऊ तापडीया , मयुर तापडीया . आदी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.