महावितरण महालबाड, शेतकऱ्यांचे उत्पादन घटले ; यावर लोकप्रतिनिधी बोलणार का ? -शेख अजिमोद्दिन
२४फेब्रुवारी २०२२रोजी उपकार्यकारी अभियंता आष्टी यांनी अहमदनगर महावितरण यांना लेखी पत्र देऊन १५दिवसाकरीता मेहकरी अहमदनगर येथून पिंम्पळा सबस्टेनला वीज पूरवठा जोडून द्यावा अशी मागणी केली होती. २४फेब्रुवारी पासून फक्त १५दिवस वीज पूरवठा दिला तर आमचा विजपूरवठा सूरळीत होईल.
१५ दिवसानंतर या वीज पूरवठ्याची गरज भासणार नाही व आमचा विजपूरवठा सूरळीत होईल असे या पत्रात नमूद आहे .
यावर विधानपरिषद सदस्य सूरेश धस यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला होता त्यावर ऊर्जा मंत्री यांनी तसे लेखी पत्र दीले असते तर काम झाले असते असे सांगितले होते. 24 फेब्रूवारी ते आज 7 एप्रील आले आहे तरी विजेचा प्रश्न सूटलेला नाही.
याचाच अर्थ महावितरण महा लबाड बोलले .
कृषी पंपांची विज ८तासाऐवजी ५तास केली , घरगुती विजपुरवठा दहा ते बारा तासच दिला जात आहे.शहरी व ग्रामीण भाग हा भेद भाव केला जात आहे. कमीशन एजंट नेमून सक्तीने वीज बील वसूली केली गेली.आमचे लोकप्रतिनिधी यावर का बोलत नाहीत हा खरा प्रश्न आहे.
पंधरा दिवसांनी विज पूरवठा सूरळीत होईल असे सांगणारे उप कार्यकारी अभियंता आष्टी यांनी याचे स्पष्टीकरण दिले पाहिजे .
विजपुरवठा सूरळीत न झाल्याने शेती उत्पादनात घट झाली आहे. मुख्यता कांदा पिकाला पाणी पुरवठा वेळेत न झाल्याने कांदा उत्पादन घटले आहे. लिंबूवर्गीय फळे पाण्याचा व्यवस्थापन न झाल्याने उत्पादन घटले आहे. आज कूठल्याही फळपीक, पालेभाज्या, यांना विजेअभावी पाणी वेळेवर मीळत नाही शेतकऱ्यांचे उत्पादन मोठ्याप्रमाणात घटले आहे.
आमचे लोकप्रतिनिधी यावर बोलणार का ?
शेतकऱ्यांना आठ तासांऐवजी पाचच तास विज पुरवठा केला जातो. शेजारच्या नगर जिल्ह्यात घरगूती विजपुरवठा २४तास व कृषी वीजपुरवठा आठ तास सूरळीत केला जातो मग आम्ही कूठल्या देशात आहोत हेच कळत नाही.
नगर जिल्ह्यात खाजगी सहायक झिरो वायरमन हा प्रकार नाही तेथे वायरमनच फ्यूज टाकतो आमच्याकडे खाजगी लोकांचा हस्तक्षेप वाढला आहे व ते पैसे घेऊन काम करतात.त्यांना अभियंत्यांनी पोसले आहे . एकूण काय तर सर्वच लबाड असल्याचे दिसते. असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेख अजिमोद्दिन यांनी केले आहे.
शेख अजिमोद्दीन
जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना बीड
stay connected