ठाण्यात प्रथमच साजरा होणार ‘जोतिराव जयंती महोत्सव’ *पहिल्यांदाच ओबीसींचा बिगर राजकीय मेळावा *प्रबोधनात्मक विचारांचा जागर होणार *अठरापगड जातींना सन्मानित करणार *प्रकाश आंबेडकरांची विशेष उपस्थिती*

 ठाण्यात प्रथमच साजरा होणार ‘जोतिराव जयंती महोत्सव’

*पहिल्यांदाच ओबीसींचा बिगर राजकीय मेळावा *प्रबोधनात्मक विचारांचा जागर होणार

*अठरापगड जातींना सन्मानित करणार

*प्रकाश आंबेडकरांची  विशेष उपस्थिती*



ठाणे (प्रतिनिधी)- राष्ट्रपिता जोतिराव फुले यांची जयंती प्रथमच ठाणे शहरात आयोजित करण्यात आलेली आहे. ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने या जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड हे या जयंती उत्सवास उपस्थित राहणार आहेत. या जयंती उत्सवानिमित्त प्रथम ठाणे शहरात ओबीसींचा बिगर राजकीय मेळावा होणार आहे. 

सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीच्या अनुषंगाने ठाणे शहरात ओबीसींच्या एकत्रिकरणाची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. विविध पक्षसंघटनांमधील अनेक कार्यकर्त्यांनी एकत्र येत ठाण्यात 3 जानेवारी रोजी ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने सावित्रीमाईंची जयंती साजरी केली होती. या जयंती उत्सवात शेकडो ओबीसी बांधवांनी उपस्थिती दर्शविली होती. ठाणे शहरातील सर्व ओबीसी बांधवांना एकत्र आणण्याच्या दृष्टीकोनातून ओबीसी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रफुल वाघोले यांनी पुढाकार घेतला होता. त्यानंतर मंगेश आवळे, मेघनाथ घरत,  संजय भालेराव, राहुल पिंगळे, सुरेश पाटीलखेडे, निलेश मंडलिक, पप्पू मोमीन, गजानन चौधरी, सुभाष देवरे, सचिन शिंदे, राज राजापूरकर, पप्पू आठवाल, राजेंद्र देसाई, सचिन  केदारी, स्वप्नील वाघोले, जितेंद्र यादव, रामाश्रय यादव, रामानंद यादव,  रामहित यादव, शिवप्रसाद यादव, प्रशांत हडकर, नितीन पाटील, संतोष मोरे, महेश ताजणे, कृष्णा भुजबळ, रामप्रकाश निषाद, गणेश कुरकुंडे,  सचिन देशमाने, यतीन पवार, अमित पाटील, अमीत गुजर, निलेश हातणकर, हेमंत राऊत, आदींनी एकत्र येत ओबीसी समाजाला एकसंघ करण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यातूनच ओबीसी एकीकरण समितीने आपले काम सुरु केले आहे.  या समितीच्या वतीने 11 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता गडकरी रंगायतनमध्ये राष्ट्रपिता जोतिराव फुले यांचा जयंती महोत्सव आयोजित केला आहे. 

या जयंती महोत्सवाचे अध्यक्षस्थान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे भूषविणार आहेत. तर, प्रमुख मार्गदर्शक म्हणून पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड,आ. निरंजन डावखरे, आ. रवींद्र फाटक,  सपा नेते एस.बी यादव, ओबीसी नेते हरिभाऊ राठोड रिपाइं नेते भय्यासाहेब इंदिसे, जितेंद्रकुमार इंदिसे,  हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी ज्येष्ठ विचारवंत सुरेश पाटील हे व्याख्यानातून ओबीसी लढ्याचे पदर उलगडणार आहेत. तसेच, यावेळी ठाणे शहरातील अठरा पगड जाती आणि अलुतेदार-बलुतेदारांचाही सन्मान करण्यात येणार आहे. या सोहळ्यास ठाणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.