*हेट स्पीच देणारी तसेच दोन समाजात तेढ निर्माण करणारे तरुणावर व समाज माध्यमावर कडक कायदेशीर कारवाई करा* *सर्व धर्मीय- राजकीय व सामाजिक संघटनांची मागणी*

 *हेट स्पीच देणारी तसेच दोन समाजात तेढ  निर्माण करणारे तरुणावर व समाज माध्यमावर कडक कायदेशीर कारवाई करा* 


*सर्व धर्मीय- राजकीय व सामाजिक संघटनांची मागणी* 


*अजामीन पात्र कलमाद्वारे कारवाई करा* 






एका बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून सिनेमागृहात काश्मीर फाईल बघितल्यानंतर जे हेट स्पीच देऊन दोन समाजात तेढ निर्माण करणारी घटना जळगाव येथे घडली असून त्या घटनेला जबाबदार असलेल्या संस्थेला, हेट स्पीच देणाऱ्या महिलेला सदर हेट स्पीच पसरवणाऱ्या समाज माध्यमाचे प्रतिनिधींवर तसेच एका रिक्षा ग्रुप वर अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद यांचे बाबत आपत्तीजनक अशी पोस्ट व्हायरल केली त्या रिक्षा ग्रुपच्या एडमिनला, प्रसारित करणाऱ्या व्यक्तीला भारतीय दंड विधान कायदा नुसार अजामीन पात्र कलमानुसार कारवाई करण्यात यावी अशी एकमुखी मागणी जळगाव शहरातील सर्वधर्मीय, राजकीय व सामाजिक संघटना द्वारे जिल्हा दंडाधिकारी व पोलीस अधीक्षक जळगाव यांच्याकडे करण्यात आली.


 *हेट स्पीच द्वारे जळगाव व विशिष्ट समाजाची बदनामी*


 जळगावात येऊन जळगावात न घडलेली घटना रक्तरंजित पणे मांडून तसेच एका विशिष्ट समाजाकडून खरेदी-विक्रीचा व्यवहार करू नका ,दर्ग्यावर जाऊ नका व काश्मीर फाईल सारखी महाराष्ट्र फाईल होऊ देऊ नका असे भडकवणारे वक्तव्य करून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या महिलेवर व ज्यांनी त्यांची हेट स्पीच समाज माध्यमांवर व्हायरल केली त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.


 *अंतिम प्रेषित बद्दल घृणास्पद मेसेज व्हायरल*


 अंतिम प्रेषित बद्दल जळगाव शहरातील एका रिक्षा ग्रुप च्या माध्यमाने  अंतिम प्रेषित व त्यांची मुलगी यांच्या बाबत घृणास्पद, अश्लिल पोस्ट व्हाट्सअप ग्रुप वर प्रसारित केली गेली त्या ग्रुपच्या ऍडमिन वर ज्यांनी प्रसारित केली त्याच्यावर गंभीर गुन्हा दाखल करण्यात यावा यापूर्वी त्यांच्यावर जामीनपात्र गुन्हा दाखल केल्याने सांबांधितांवर  काहीच परिणाम न झाल्याने  अशा असत्य, खोट्या व महापुरुषांच्या बदनामीकारक पोस्ट प्रसारित करण्यात आलेली आहे व होत आहे. त्यामुळे त्यांच्यावर अजामीन पात्र कलमानुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.


 *सर्वधर्मीय ,राजकीय व समाज सेवक  शिष्टमंडळात यांचा होता समावेश*


 महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोशल फोरमच्या उपाध्यक्षा श्रीमती प्रतिभा शिरसाठ, महिला सुरक्षा समितीच्या श्रीमती निवेदिता ताठे, वंचित आघाडीच्या श्रीमती नसरुल फातेमा, जनक्रांती मोर्चाचे संस्थापक मुकुंद सपकाळे, लोकसंघर्ष मोर्चा चे भरत कर्डिले, वीर सावरकर रिक्षा युनियन चे दिलीप सपकाळे ,जन क्रांतीचे वाल्मीक सपकाळे, छावा युवा मराठा महासंघाचे अमोल कोल्हे, मानियार बिरादरीचे प्रदेश अध्यक्ष फारूक शेख, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सरचिटणीस बाबा देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष अल्पसंख्यांक सेल मजहर पठाण, मनसेचे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महानगराध्यक्ष मुजीब पटेल, एम आय एम चे जिल्हाध्यक्ष अहमद शेख, कुल जमातीचे अध्यक्ष सय्यद चाँद,वहिदत ए इस्लामी चे डॉक्टर जावेद शेख, पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया चे जकी पटेल एम्स चे अतिक शाह,समाजवादी पार्टीचे प्रदेश सचिव प्रतिनिधी शकील बागवान, शिकलगार बिरादरीचे मुजाहिद खान, ईदगाह ट्रस्टचे अनिस शाह,काँग्रेसचे अमजद पठाण, रिक्षा युनियनचे असलम शेख  आदींची उपस्थिती व स्वाक्षरी होती


फोटो कॅप्शन

१)अप्पर जिल्हा दंडाधिकारी राहुल पाटील यांना निवेदन देताना

 २)अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांना निवेदन देताना


 प्रतिभा शिरसाठ, निवेदिता ताठे ,मुकुंद सपकाळे, जमील देशपांडे, मझहर खान, मुजीब पटेल ,फारुक शेख, अमोल कोल्हे ,बाबा देशमुख आधी दिसत आहे


 ३)जिल्हा अधिकारी कार्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव येथे उपस्थित एकत्रित शिष्टमंडळाचे छायाचित्र

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.