शेतकरी सहकारी सुतगिरणीचे चेअरमन शेख मैनुद्दीन यांचे निधन

 शेतकरी सहकारी सुतगिरणीचे चेअरमन शेख मैनुद्दीन यांचे निधन



आष्टी ( प्रतिनिधी ) - कडा शेतकरी सहकारी सुतगिरणीचे चेअरमन शेख मैनुद्दीन यांचे सोमवार दि . १७ रोजी सकाळी ९ वा .अल्पशा आजाराने निधन झाले . मृत्युसमयी त्यांचे वय ६५ वर्षे होते . माजी आमदार भिमराव धोंडे यांचे ते अत्यंत जवळचे मित्र होते . त्यांच्या पश्चात दोन मुले , सुना नातवंडे असा परिवार आहे . ते अतिशय प्रेमळ ' हसमुख व शांत स्वभावामुळे ते सर्वत्र सुपरिचीत होते . त्यांच्यावर गेल्या काही दिवसां पासुन अहमदनगर येथे उपचार सुरु होते . उपचारा दरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली . धानोरा येथील कब्रस्थान येथे त्यांचा दफनविधी ३.३० वाजता पार पडला . यावेळी माजी आमदार भिमराव धोंडे , जमीयत उलेमा ए हिंद चे जिल्हाध्यक्ष मुफ्ती शफीक साहेब , डॉ . नदीम शेख , पंचायत समीती सदस्य परमेश्वर काका शेळके , माजी सभापती अंकुशराव चव्हाण , नियामत बेग , शिवाजी सुरवसे , नामदेव शेळके , सरपंच देविदास उदावंत  , विभीषण कवडे , सय्यद अल्लाउदीन , प्राचार्य विधाते सर , पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद ढोबळे , पत्रकार उत्तम बोडखे , प्रा राम बोडखे , जावेद पठाण , गौतम सावंत तसेच विवीध क्षेत्रातील मान्यवर व नातेवाईक उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.