*आष्टीचे भगवान शिनगीरे यांचा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने मोदी यांच्या हस्ते गुजरात येथे झाला सन्मान*
*********************
*********************
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील वटनवाडीचे आदर्श माजी सरपंच, कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक, तथा विवेकानंद सेवाभावी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भगवान शिनगीरे यांचा त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशनकडून आंतरराष्ट्रीय ग्लोबल युथ आयकॉन (International Global Youth Icon Award) या पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद दामोदरदास मोदी यांच्या हस्ते भगवानराव शिनगीरे यांचा दि.१६ जानेवारी २०२२ रोजी वडोदरा गुजरात येथे सन्मान झाला. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले,राजन त्रिवेदी कॅबिनेट मंत्री गुजरात, डॉ.जसबिर सिंग अमेरिका, डॉ.सोमा घोष पद्मश्री पुरस्कार प्राप्त, डॉ.तिवारी अध्यक्ष FWICF, गायक राम शंकर, डॉ.निरंकरनाथ तिवारी, डॉ.विजय बजाज व आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिनगीरे यांच्यासोबत राजेश मुटकुळे हे उपस्थित होते.व त्यांचा 30 जानेवारी 2022 रोजी राज्यस्तरीय यशवंत रत्न पुरस्काराने बीड येथे ही सन्मान होणार आहे.
stay connected