*जैन कॉन्फरन्स दिल्ली च्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य पदी जामखेड चे सामाजिक कार्यकर्ते श्री. संजय कोठारी यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल*
*सिद्धिविनायक प्रतिष्ठान जामखेड मार्फत*
*त्यांचा सत्कार करण्यात आला*
सत्काराला उत्तर देताना सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले मी जैन काॅन्फरन्सचे २००५ सालापासून काम करत आहे आत्ता सध्या २०१६ ते २०१८ व २०१८ ते २०२१ आणि आता २०२१ ते २०२३ वर्षासाठी माझी विरोध निवड दिल्लीच्या जैन कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड झालेली आहे आपल्या सारख्यांच्या आशीर्वादामुळे मला हा योग आलेला आहे तुम्ही दिलेल्या आशीर्वादाने मी सतत कार्य करत राहील आपण पण समाजसेवा करून पहा किती आनंद मिळतो प्रत्येकाने एक जरी कार्य केले तरी त्याचे आत्मिक समाधान फार चांगले मिळते एवढेच मी सांगू शकतो
यावेळी सिद्धी विनायकचे सचिन देशमुख म्हणाले संजयकाका कोठारी यांच्या कार्याला तोडच नाही गेली पंचवीस वर्षापासून ते समाजसेवा करत आहेत कुठेही अपघात होऊ द्या रात्री दोन वाजता त्यांना फोन करा ते ताबडतोब स्वतः आपली गाडी घेऊन जातात आणि ते जखमींना वाचवण्याचा प्रयत्न करतात तसेच कोरोना काळामध्ये त्यांनी कुठेच मागे न राहता बरेच काम केले त्याबद्दल त्यांचे आभार तसेच त्यांची तिसऱ्यांदा देशपातळी वर बिनविरोध निवड झाली हे जामखेड भाग्यच आहे
यावेळी बोलताना अध्यक्ष सुंदरराव देशमुख म्हणाले आत्तापर्यंत मी संजय काका कोठारी यांचे काम जवळून पाहिले आहे यांच्या हाताने अशीच सेवा घडो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो
यावेळी महेश कुकरेजा म्हणाले संजय कोठारी हे माझे वर्गमित्र आहे लहानपणापासून समाजसेवेची आवड असणारे आणि त्यांच्या घरात सर्वच लोक समाजसेवा करतात आणि संजूभाऊ चे या कामामुळे आपल्या जामखेड चे नाव उंचावले आहे.योगेश देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी सिध्दिविनायक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुंदरराव देशमुख, सचिव सचिन देशमुख ,संचालक रामचंद्र होशिंग,महेश (प्रदीप) कुकरेजा, बाळासाहेब मोरे ,सुहास देशमुख, जिज्ञासू अरोरा ,योगेश देशमुख ,देविदास महाडीक ,राजेंद्र लोहार, संतोष वीर, बजरंग देशमुख ,पवन देशमुख ,प्रवीण होळकर ,अक्षय शेळके, अतिष कोळपर, महेश कात्रजकर ,पत्रकार धनराज पवार आदी उपस्थित होते
.
🙏🏻💐💐🙏🏻
stay connected