सुरेश वांगीकर यांच्या रूपाने अभ्यासू सल्लागार हरपला..किशोर नाना हंबर्डे आष्टी प्रतिनिधी
सुरेश वांगीकर,चार्टर अकाउंटंट कल्याणचंद कोटेचा यांचे टॅक्स सल्लागार आणि टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशनचे उपाध्यक्ष होते.टॅक्स संबंधी सोप्या पद्धतीने समजून सांगण्यात त्यांचा हातखंडा होता.बीड जिल्ह्याच्या पंचक्रोशीत त्यांनी स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली होती.पोटाच्या विकारामुळे आज ते आपल्यातून अल्पवयात निघून गेले.सुरेश वांगीकर यांच्या रूपाने अभ्यासू सल्लागार हरपला,या शब्दात संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एडवोकेट बी.डी. हंबर्डे महाविद्यालयात श्रद्धांजली कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.
stay connected