*जनसामान्यांचे आधारवड बाळू काका..*

 *जनसामान्यांचे आधारवड बाळू काका..* 

सिनाकाठी जन्मले, वाढले... 

बापूंच्या आशिर्वादाने जनतेत स्थिरावले... 

साथ भाऊ,आबा अन आपना सर्वांची... 

कृपा ग्रामदैवत महादेवाची... 

आयुष्य म्हणजे ऊन-सावल्यांचा खेळ... 

 जिद्दीने सच्चाईने घातला त्यांनी मेळ....











 


भूतकाळात मी फारसा रमणारा नाही. मी लहान असताना मला चांगले आठवते, त्यावेळी बापू आमदार होते. माझे वडील कै.अण्णा कै.बापूंचे (काकांचे वडील)मावस भाऊ होते. माझे वडील अण्णा गावचे सरपंच होते,माझे चुलते दादा सभापती होते. कुटुंब राजकारणी असल्यामुळे बापू सतत सोलापूरवाडीला येत असत.

 आमच्या कुटुंबावर, सग्या सोयऱ्या वर बापूंचे विशेष लक्ष,प्रेम होते.

 त्यांचाच वसा घेऊन काकांचे मोठे बंधू चंद्रकांत भाऊ विलास आबा व काका, 

 तीच भूमिका तेवढ्याच तोलामोलाची कै.बापू च्या नंतर पहाडासारखी उभी केली. जनमाणसात वावरत असताना त्यांचे पाय जमिनीवर घट्ट आहेत. काकांचा एक साधा सोपा मंत्र आहे तो म्हणजे जसं समोर येईल तस आयुष्य स्वीकारा, व्यक्ती मधल्या गुणांचा डोळस आदर करा,  अवगुनाकडे कानाडोळा करा

 चौकस विद्यार्थ्यांच्या भूमिकेत नवीन शिकण्याची तयारी ठेवा.एखादी अभिनव कल्पना त्यांच्यापुढे मांडताच त्यांची ज्ञानेंद्रिये तल्लख  होऊन कामाला लागतात.विज्ञान, तंत्रज्ञान, शेती, पाणी व व्यवस्थापन हा काकांचा आवडीचा विषय. काकांची नजर घारीची आहे एखादा साध काम सुद्धा  ते फार काटेकोरपणे हाताळतात,जबाबदारी विश्वासाने सोपवतात. फारसा हस्तक्षेप न करता काम नीट होतोय ना याकडे मात्र त्यांचं बारीक लक्ष असतं. दुष्काळ आणि कोविड मुळे विकासात्मक कामाला जास्त वेळ देता आला नाही, निधी नव्हता तरी दादांचे,धनु भाऊ च्या माध्यमातून खुंटेफळ साठवण तलावाचे काम मार्गी लावले,मतदार संघामध्ये शंभर बेडचे  ऑक्सिजन हॉस्पिटल, सरकारी दवाखान्यात लहान मुलांचे आपत्कालीन सोय, मोफत पुरवलेले रेमडीश्वर इंजेक्शन, गावोगावी उभी केलेली कोविड  सेंटर,गरजू कुटुंबाला,दीनदुबळ्याना, दिव्यांगां लॉकडाऊनमद्धे आवश्यक साहित्य, किराणा पुरवला.मतदार संघातील प्रत्येक गावाला दिलेला निधी यामुळेच अल्पावधीत काका सर्वसामान्यांच्या गळ्यातले ताईत बनत आहेत. लोकहिताचा विचार करणारा लोकांसाठी सदैव उभा असणारा, लोकांसाठी झटणारा, झगडणारा, माणसाचा माणूस होणारा,  माणसाचे दुःख जाणनारा, माणसात समरस होणारा, जन माणसाचे मन जिंकणारा सच्चाई चा मार्ग स्वीकारणारा सातत्याने नवे शोधणारा, 

 अशा सर्वगुणसंपन्न सर्वसामान्यांवर निखल निरपेक्ष प्रेम करणाऱ्या विकास पुरुषाला त्यांच्या वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा!!

.... शिरीष भाऊ थोरवे.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

stay connected