" सर्वसामान्यांच नेतृत्व आमदार आजबे काका "

 " सर्वसामान्यांच नेतृत्व आमदार आजबे काका "

*****************************




भारतीय राजकारणामध्ये ग्रामीण भागातील राजकीय नेतृत्व मोठ्या संख्येने पुढे आले पाहिजे हा भारतीय लोकशाहीचा प्रमुख उद्देश आहे. होऊन गेलेल्या जुन्या राजकीय नेत्यांच्या कुटुंबातील त्यांच्या पुढच्या पिढीचे नेतृत्व तयार होणे हे देशाच्या,महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाही.




    बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघाला तर उज्वल नेतृत्वाची मोठी परंपरा लाभली आहे आष्टी तालुक्यातील शिराळ या गावाने तर आतापर्यंत तीन आमदार या मतदारसंघाला दिले आहेत कै. विश्वनाथभाऊ आजबे,कै. भाऊसाहेब आजबे व सद्याचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे ज्यांना लोक प्रेमाने काका या नावाने संबोधतात, काकांचे वडील असलेले कै. भाऊसाहेब आजबे यांच्या आमदारकीच्या काळाचा प्रभाव हा संपूर्ण जिल्ह्यावर पडलेला होता.त्यांच्या मृत्यूनंतर आजबेंचे घर राजकारणात मागे पडले मध्यंतरीच्या काळात भाऊसाहेब आजबे यांचे तिसरे चिरंजीव बाळासाहेब आजबे यांनी युवक काँग्रेस मध्ये प्रवेश करून स्वतःचे नेतृत्व विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू केला त्याकामी शिराळ या त्यांच्या गावानी त्यांना खूप साथ दिली त्याद्वारे ते स्वतःच्या हक्काचे संघटन निर्माण करून राजकारणात स्थिर होऊ लागले, लोकांचे सार्वजनिक व व्ययाक्तिक प्रश्न सोडविण्यासाठी आक्रमकपणे लढू लागले कुठल्याही पातळीवर कार्यकर्त्याच्या मागे ठाम उभा राहू लागले या तरुण नेत्याच्या कामाची दखल जिल्हा पातळीवर घेतली जाऊ लागली म्हणूनच महाराष्ट्राचे नेते व बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र कै. गोपीनाथ मुंडे साहेब यांनी त्यांचा भाजप पक्ष राजकीय दृष्ट्या अडचणीत असताना काकांना आग्रहाने भाजप मध्ये प्रवेश करायला लावला व त्यानंतरच काकांची राजकीय वाटचाल ही दमदारपणे सुरू झाली,अठरा पगड जातीचे कार्यकर्ते काकांबरोबर काम करू लागले काकांच्या नेतृत्व गुणातील कल्पकता व धडाडीमुळे अनेक जिवाभावाचे लोक काकासाठी आपले तन,मन, धन लावून निष्ठतेने काम करू लागले.मुंढे साहेबांसारख्या मोठ्या नेतृत्वाबरोबर काम करत असल्यामुळे काकांचे नेतृत्व सर्वार्थाने पुढे आले म्हणूनच गोपीनाथ मुंढे साहेबांची आठवण काकांना आजही प्रत्येक प्रसंगी येते.राजकीय नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला सतत नवनवीन आव्हानाला सामोरे जावं लागतं आष्टी मतदारसंघात तर प्रस्थापित असलेल्या राजकारण्यांच्या विरोधात लढाई करून स्वतःचे नेतृत्व तयार करणे ही सोपी गोष्ट नव्हती त्यासाठी गेली पंधरा वर्षे काकांनी रात्रंदिवस एक केला,अपार कष्ट घेतले त्यामुळेच पंचायत समिती,जिल्हा परिषदेचे सदस्य ते आजचे विधानसभा सदस्य हा त्यांचा राजकीय प्रवास शक्य झाला.कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीत धैर्यशील राहून कायम सकारात्मक विचार करणे हे काकांच्या राजकारणाचे मुख्य सूत्र ठरले, स्पर्धात्मक राजकारणमध्ये सत्ता मिळवून ती फक्त गाजविण्यापेक्षा प्रत्यक्ष जनहिताची कामे आपल्या कृतीतून सादर करणे हे काकांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे 





राजकारणाचा वापर स्वतःच्या स्वार्थसाठी ते कधीच करत नाहीत ते नाही पटलं तर एक वेळेस राजकारण सोडतील पण स्वतःच्या तत्वांशी, मूल्यांशी कधी तडजोड करणार नाहीत.आज मतदारसंघातील प्रत्येक प्रश्न,अडचण सोडविण्याकडे त्यांचा कायम कल असल्याचा दिसून येतो,त्यांच्या चालू असलेल्या गावभेट दौऱ्यात गावातील पारावर किंवा मंदिरात बसून गावातील समस्या ग्रामस्थाकडून समजून घेऊन तिथेच सोडविण्याचा प्रयत्न ते करतात व प्रशासनाला तशा सूचना देऊन त्याचा अवहाल स्वतःकडे मागवतात,जे काम होतील तेच खरे आश्वासन ते जनतेला देतात किंबहुना फक्त राजकारण म्हणून जनतेला खोटे आश्वासन ते कधी देत नाहीत हाच त्यांचा स्वभाव आहे आज त्यांच्या दोन वर्षांच्या आमदारकीच्या काळात कोरोना संकट असून देखील शासनाच्या विविध विभागामार्फत त्यांनी आतापर्यंत 300 कोटी रुपयांचा विकास  निधी  मतदारसंघासाठी आणला आहे,बहुतांश मतदारसंघातील प्रत्येक गावात विविध  प्रकारचे विकास कामे त्यामुळे शक्य होत आहेत,प्रत्येक घटकासाठी सहजा सहजी आमदार उपलब्द होत असल्यामुळे काकांच्या नेतृत्वाने लोकांच्या मनात घर केले आहे एक समजूतदार व प्रामाणिक नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे,मतदारसंघात कुठेही नैसर्गीक संकट आले किंवा व्ययाक्तिक कुठला माणूस अडचणीत सापडला तर त्यावेळी मदतीसाठी काका लगेच हजर असतात.कोरोना महामारीच्या संकट काळात प्रशासन व आरोग्य यंत्रणेबरोबर कायम संपर्क त्यांनी ठेवल्यामुळे कोरोना रुग्णाला त्याची मोठी मदत झाली,आष्टी,पाटोदा, शिरूर या तीनही तालुक्यात रुग्णांसाठी मोठ्या संख्येने ऑक्सिजन बेडची व्यवस्था त्यांनी केली,आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयासाठी अजित दादा पवार,राजेश टोपे व धनंजय मुंडे यांच्याकडे विशेष प्रयत्न करून अडीच कोटी रुपये किमतीचा ऑक्सिजन निर्मिती प्लांट मंजूर करून आणला त्याचे ही काम आज प्रगतीपथावर आहे.काकांनी स्वतः चालू केलेल्या विविध ठिकाणच्या कोविड सेन्टर मध्ये त्यांनी व  कार्यकर्त्यांनी कोरोना रुग्णांची काळजी स्वतःच्या घरची माणसं असल्यासारखी घेतली.






काका जे काम हाती घेतात त्या कामाचे दायित्व स्वीकारून ते काम जबाबदारीने पार पाडतात हेच त्यांच्या यशाचे खरे गमक आहे,आष्टी येथे उपजिल्हा रुग्णालय व उपजिल्हा न्यायालय मंजूर व्हावे यासाठी ते आज शासनाकडे विशेष प्रयत्न करत आहेत.सार्वजनिक धोरण राबवताना प्रशासनाला बरोबर घेऊन कसें काम करायचे याचा उत्तम आदर्श काकांनी या दोन वर्षांच्या काळात दाखवून दिला त्याचा फायदा ही अनेक विभागात झालेला आज पाहायला मिळतो. दुसरे राजकीय पक्ष किंवा त्यातील नेत्यांवर टीका करण्यापेक्षा त्यांना बरोबर घेऊन आपण काय काम करू शकतोत याचा विचार ते प्राधान्याने करतात.स्वतः एक मराठा म्हणून फक्त मराठा जातीसाठी राजकारण काकांनी कधी केले नाही सर्व जात,धर्म,पंथ,कष्टकरी,शेतकरी,

व्यापारी,नौकरदारांचे प्रश्न सोडविणे हाच उद्देश ते राजकारण करत असताना ठेवतात.

विधानसभेला निवडून आल्यानंतर पहिल्याच वर्षी  त्यांनी कित्येक  वर्षांपासून रेंगाळत पडलेला कुकडीचा पाणी प्रश्न शरद पवार साहेबांना विशेष प्रयत्न करून सोडवायला लावला त्यासाठी पवार साहेबांच्या दौऱ्यात  त्यांना ते धरण स्थळी घेऊन गेले होते.कुकडीचे पाणी सीना धरणातून मेहकरी धरणात आणताना ज्या  अडचणी येत होत्या त्यासाठी काका स्वतः धरण क्षेत्रात उभे राहून प्रशासनाला सूचना व मदत करताना दिसत होते,मेहकरी मध्ये आलेल्या या कुकडीच्या पाण्यामुळे आष्टी तालुक्यातील बराच भाग  बारमाही बागायती होण्यासाठी मदत होणार आहे,काकांचा स्वतःचा मुख्य  व्यवसाय शेती हा असल्यामुळे शेती या क्षेत्राशी त्यांना विशेष लगावं आहे ते आजही स्वतः कुटुंबाबरोबर जाऊन शेतातील सर्व काम करतात मागे सतत पडत असणाऱ्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे पशुधन वाचवण्यासाठी काकांनी ठिकठिकाणी जनावरांच्या छावण्या उभारल्या होत्या त्यांच्या एका छावणीत तर गोपीनाथ मुंडे साहेब मुक्कामाला राहिले होते ती बाब सगळ्या महाराष्ट्रात त्याकाळी गाजली होती.

लोकशाही मध्ये विविध मार्गांनी यशस्वी सत्ता राबविणे हे उत्तम नेतृत्वाचे खास कसब काकांच्यात जाणवते, जनसंवाद कसा ठेवावा हे काकांच्या व्यापक संपर्कातून कळतो, त्यांच्या भाषणात विषयांची मुद्देसुद मांडणी,विरोधकांना सडेतोड उत्तर,कारारीपणा,सामाजिक मार्गदर्शन दिसते,कार्यकर्ता व नेता या  दोघांना एकमेकांबद्दल मनातून वाटणारा आदर असे एकमेव नेतृत्व काकांचे आहे काकांना राजकारणात पदोपदी मोठा संघर्ष करावा लागला परंतु त्या संघर्ष काळापासून आतापर्यंत काकांच्या एक स्वतंत्र विचारांची सर्वसामान्य कार्यकर्त्यांची एक मोठी फळी तयार झाली आहे,ते कार्यकर्ते स्वतःच्या राजकीय व आर्थिक फायद्याचा कधीही विचार करत नाहीत त्यांच्यासाठी काकांचे नेतृत्व हीच स्वाभिमानाची गोष्ट आहे,काकांच्या रुबाबदार व्यक्तीमत्वाकडे पाहून कार्यकर्त्यांनाही उत्साही वाटते.2019 च्या विधानसभेला तर गाव गावच्या लोकांनी वर्गणी गोळा करून काकांना आमदार केले आहे.नेतृत्व,कर्तृत्व व वक्तृत्व याच्या जोरावर स्वतःचे एक वेगळे स्थान काकांनी बीड जिल्ह्याच्या राजकारणात तयार केले आहे,राजकारणातील    सर्वसामान्यांच एक आदर्श नेतृत्व म्हणून आमदार बाळासाहेब आजबे या नावाची एक अजब शक्ती नावारूपास येत आहे,28 ऑगस्टला काकांचा जन्मदिवस विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन साजरा होतो आहे,काकांचे नेतृत्व दिवसेंदिवस वृद्धिंगत होत जावो त्यांना आरोग्यादायी दीर्घायुष्य लाभो व त्यांच्या हातून सर्वसामान्यांची सेवा कायम घडो हीच भगवंत चरणी प्रार्थना व शुभेच्छा....!!


लेखक-

प्रा.महेश कुंडलीकराव चौरे,

आष्टी.

मो-9423471324

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.