शिवराज्यभिषेक दिनानिमित्त बोपोडी येथे महा रक्तदान शिबिराचे आयोजन
मूलनिवासी मुस्लीम मंचाच्या कार्यकर्त्यांनी केले रक्तदान
बोपोडी येथे शिवराज्यभिषेक दिनाचे अवचित्य साधून बोपोडी येथे मा.शिक्षण मंडळ सदस्य अमित मुरकुटे यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,या शिबिरात बोपोडी व परिसरातील 175 नागरिकांनी रक्तदान करून आपले योगदान दिले विशेषतः कॉविड 19 मुळे मृत्यू पावलेल्या सर्व धर्मीय लोकांचे मोफत अंत्यविधी करणाऱ्या मूलनिवासी मुस्लिम मंचाच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान केलं. या कार्यक्रमाचे नियोजन समृद्धी गणेश मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले होते.
याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष अमित ज्ञानेश्वर मुरकुटे मूलनिवासी मुस्लिम मंचाचे बबलू पिरजादे, अमित सय्यद, नौशाद शेख, नदीम लकडावाला, नूर शेख, रियाज इनामदार समेत अनेक कार्यकर्त्यांनी रक्तदान केले.
stay connected