संत नागेबाबा कोविड सेंटर भेंडा येथे पंचायत समिती शिक्षण विभागाच्या शिक्षकांनी कोवीड ग्रस्तासाठी केला मनोरंजनासाठी कार्यक्रम
भेंडा - पंचायत समिती शिक्षण विभागाच्या गीतमंच शिक्षकांनी संत नागेबाबा कोवीड सेंटर येथे कोवीड ग्रस्त रुग्नांसाठी दोन तास मनोरंजनासाठी भक्तीगीत, भावगीत, फिल्मचे गीत, प्रेरणा देणारी गीत गायन करुन या रुग्णांचे मनोबल वाढवले. गीतमंच चे मा हिवाळे बुथवेल सर, गवळी रामभाऊ सर, सानप सुरेश सर, एडके प्रविण सर व झिंजुर्डे सुप्रिया मॅडम यांनी खुप सुंदर गीत गायन करुन कोवीड सेंटरचे वातावरण संगितमय केले. मा गटशिक्षणाधिकारी पटारे मॅडम व विस्तार अधिकारी मा कराड साहेब यांनी शिक्षकांना योग्य ती काळजी घेऊन कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मा कोविडसेंटरचे प्रमुख चिंधे यांनी देखील गीत गगायन केले. या कोरोना ग्रस्तांसाठी सुप्रिया झिंजुर्डे व डाॅ सुरेश झिंजुर्डे यांनी खाऊ वाटप केला. काही काळ येथील वातावरण आनंदमय झाल्याने रुग्णांना काहीकाळ दिलासा मिळाला. मा कडुभाऊ काळे पाटील यांचे शिक्षकांनी आभार मानले
stay connected