Tejwarta Kalyan News

 ​कल्याणमध्ये कचरु सोमाजी शिंदे 'दादा' यांचा प्रथम स्मृतिदिना निमित्ताने लौकिक भास्कर शिंदे यांचा सत्कार




​कल्याण (आशा रणखांबे):

स्मृतिशेष कचरु सोमाजी शिंदे 'दादा' यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त कल्याण येथील जेतवन बुद्ध विहार, अशोक नगर, वालधुनी येथे अत्यंत भावपूर्ण  वातावरणात  कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याला परिसरातील बौद्ध उपासक, नातेवाईक, मित्रपरिवार आणि हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

​कार्यक्रमाची सुरुवात बुद्धवंदना व महामानवांच्या प्रतिमेस अभिवादन करून झाली. त्यानंतर आयोजित केलेल्या वैचारिक व मार्गदर्शक सत्रात प्रमुख वक्त्यांनी कचरु सोमाजी शिंदे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.

या प्रसंगी प्रा. डॉ. वि. सो. शिंदे यांनी अध्यक्ष स्थान भुषविले त्यांनी आपल्या मनोगतात स्मृती शेष कचरु सोमाजी शिंदे यांच्या 77व्या वाढदिवसाच्या निमित्ताने घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी दिलेला संदेश जसे व्यसन करु नका, अंधश्रद्धा पाळू नका, स्वाभिमानाने जगा, एक दुसऱ्याला आधार द्या यांचा उल्लेख केला आहे. तसेच  .प्रा. डॉ. अल्का शिंदे / पवार यांनी प्रा. डॉ. वि.सो.शिंदे यांची आधारवड  नावाची कविता सादर केली ही कविता दादांच्या एकूणच व्यक्तित्वावर प्रकाश टाकते. यानंतर  समाजसेवक आयु. सुनील घेगडमल यांनी दादांच्या स्मृतीना आदरांजली वाहिली आणि आजच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले.भास्कर शिंदे यांनी आदरांजली वाहताना दादांच्या स्वभावाच्या विविध पैलूनवर चर्चा केली.बौद्धाचार्य सुरेश कटारे यांनी आपले शरीरच खरा मित्र आहे त्याची काळजी आपण घेतली पाहिजे असा संदेश दिला तर बौद्धाचार्य नामदेव दोंदे यांनी स्वरचित कविता सादर केली , संजना मिलिंद शिंदे यांनी बाबांच्या प्रेमळ स्वभावाचा उल्लेख करुन आदरांजली वाहिली तसेच एडवोकेट नागेश कांबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपल्या मनोगतात वक्त्यांनी 'दादा' यांच्या सामाजिक आणि पारिवारिक आठवणींना उजाळा देत त्यांच्या विचारांची प्रेरणा कायम ठेवण्याचे आवाहन केले.तसेच दरवर्षी स्मृतिशेष कचरु सोमाजी शिंदे यांच्या स्मृतिदिना निमित्त शिंदे कुटुंबाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा पुरस्कार देण्याचे घोषित केले. यावर्षीचा पुरस्कार सी ए कोर्स चा अभ्यासक आयु. लौकिक भास्कर शिंदे यांना प्रा.डॉ.वि सो शिंदे लिखित पुस्तके आणि रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.

​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास पंडित यांनी अत्यंत नेटकेपणाने केले.

​ हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  आयु. प्रभाकर शिंदे आणि समस्त शिंदे परिवार आणि जेतवन बुद्ध विहार  समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर