Tejwarta News Network 24 June 2026

 Tejwarta News Network 24 June 2026

लोहा तहसीलदारांना १० दिवसांचा अल्टिमेटम; ४ दिवसांत कारवाईचे आश्वासन, अन्यथा नांदेड जिल्हा कडकडीत बंदचा भीमसैनिकांचा इशारा!लोहा :- चंद्रकांत वाघमारे  लोहा येथील जायकवाडी वसाहतीमधील ४० वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक पंचशील ध्वज नगरपालिकेने हटवल्याप्रकरणी आता वाद आणखी पेटला आहे. या घटनेच्या निषेधार्थ भीमसैनिक आणि आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी आज थेट लोहा तहसील कार्यालयावर धडक देत प्रशासनाची कोंडी केली. आंदोलकांनी तहसीलदारांना १० दिवसांचा स्पष्ट अल्टिमेटम दिला असून, मागणी मान्य न झाल्यास संपूर्ण नांदेड जिल्हा कडकडीत बंद ठेवण्याचा आणि बेमुदत रास्ता रोको करण्याचा तीव्र इशारा दिला आहे.शासकीय प्रशासनाची झाली कोंडी; मोठा पोलीस फौजफाटा तैनातलढाऊ भीमसैनिक पंचशिल कांबळे, शंकर महाजन आणि जिल्ह्यातील इतर प्रमुख नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी तहसील कार्यालय परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलीस बंदोबस्त असतानाही आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. "प्रशासनाने पंचशील ध्वज हटवून आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करून कारवाई झालीच पाहिजे," अशी आक्रमक भूमिका नेत्यांनी मांडली. यावेळी आंदोलकांच्या रोषामुळे काही काळ प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे कोंडीत सापडली होती.पंचशिल कांबळे यांचे शांततेचे आवाहन, नागरिकांचे सहकार्य सर्व घटनेमुळे परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लढाऊ भीमसैनिक पंचशिल कांबळे यांनी तात्काळ पुढाकार घेतला. त्यांनी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना कायदा हातात न घेता, संपूर्ण आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्याचा अत्यंत महत्त्वाचा इशारा व आवाहन केले. उपस्थित सर्व बांधवांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या या आवाहनाला मान देत पूर्ण सहकार्य केले, ज्यामुळे हा विराट आक्रोश मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडला.तहसीलदारांचे ४ दिवसांत कारवाईचे  आश्वासनभीमसैनिकांचा वाढता आक्रोश आणि आंदोलनाची आक्रमकता लक्षात घेता, लोहाच्या तहसीलदारांनी तात्काळ या प्रकरणात मध्यस्थी केली. "सदरील संवेदनशील बाबतीत पुढील चार दिवसांच्या आत संपूर्ण चौकशी करून योग्य ती कायदेशीर कार्यवाही पूर्ण केली जाईल," असे आश्वासन तहसीलदारांनी आंदोलकांना दिले.नांदेड जिल्हा बेमुदत बंदचा भावनिक इशारातहसीलदारांच्या आश्वासनानंतरही भीमसैनिकांनी प्रशासनाला १० दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. जर दिलेल्या वेळेत दोषींवर कठोर कारवाई झाली नाही, तर केवळ लोहा तालुकाच नव्हे, तर संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील खेडेपाडे आणि शहरे पूर्णपणे बेमुदत बंद ठेवण्यात येतील, असा इशारा देण्यात आला. यावेळी भीमसैनिक अत्यंत भावनिक होऊन बोलताना दिसत होते. "हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. जर तात्काळ दखल घेतली गेली नाही, तर संपूर्ण जिल्हा कडकडीत बंद ठेवून बेमुदत रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल आणि याला सर्वस्वी शासन जबाबदार असेल," असा गर्भित इशारा भीमसैनिकांनी दिला आहे.या गंभीर आंदोलनामुळे लोहा तालुक्यात सध्या राजकीय आणि सामाजिक वातावरण पूर्णपणे तापले असून, प्रशासन पुढील चार दिवसांत काय पावले उचलणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे

Tejwarta News Network 24 June 2026






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.