मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे श्री क्षेत्र चौंडी येथे आ.सुरेश धस यांनी स्वागत केले.
आष्टी (प्रतिनिधी) पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त श्री क्षेत्र चौंडी येथे आयोजित कार्यक्रमास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांचे आ. सुरेश धस यांनी गुलाब पुष्प देऊन उत्स्फूर्त स्वागत केले.या प्रसंगी महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे,आ.गोपीचंद पडळकर, आ.अक्षय कर्डिले,यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाविक, नागरिक आणि कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला. श्री क्षेत्र चौंडी येथे उत्साहपूर्ण वातावरणात जयंती सोहळा पार पडला.
यावेळी आ. सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करताना त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सुरू असलेल्या विकासकामांबाबत समाधान व्यक्त केले. कार्यक्रमात अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी कार्याचा गौरव करण्यात आला.


stay connected