द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी भैय्यासाहेब बॉक्सर यांची नियुक्ती
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर द युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी भैय्यासाहेब बॉक्सर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष अन्सार शेख यांनी त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली.
भैय्यासाहेब बॉक्सर यांची सामाजिक, पत्रकारितेतील योगदान व संघटनात्मक बांधिलकी पाहता जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली असल्याचे अन्सार शेख यांनी म्हंटले आहे. संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नवनियुक्त जिल्हाध्यक्षांचे अभिनंदन केले असून या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
यावेळी निवड होताच पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी,पत्रकारांच्या मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी तसेच जेष्ठ पत्रकारांच्या आरोग्यासाठी आपण काम करणार असल्याचे यावेळी भैय्यासाहेब बॉक्सर यांनी म्हंटले आहे.


stay connected