पत्रकार अविनाश कदम यांना जिजाऊ माँसाहेब आदर्श पत्रकारिता पुरस्कार जाहीर
आष्टी। प्रतिनिधी
मराठा सेवा संघ प्रणीत तानुबाई बिरजे पत्रकार परिषद, आष्टी यांच्या वतीने प्रथमच विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना 'जिजाऊ माँसाहेब आदर्श राज्यस्तरीय पुरस्कार' देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमातर्फे यावर्षीचा आदर्श पत्रकारिता पुरस्कार दै लोकमत व मराठवाडा साथीचे आष्टी तालुका प्रतिनिधी अविनाश कदम यांना जाहीर करण्यात आल्याची माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार सिताराम पोकळे यांनी दिली.
अविनाश कदम हे दैनिक लोकमत व मराठवाडा साथीचे आष्टी तालुका प्रतिनिधी तथा आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष तसेच मराठी पत्रकार परिषदेचे बीड जिल्हा उपाध्यक्ष आहेत. गेल्या १७ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय असलेल्या कदम यांनी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी, आरोग्य, धार्मिक या विविध क्षेत्रांतील गोरगरीब व सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून दिला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीच्या दखलमध्ये हा पुरस्कार देण्यात आला आहे.आयोजन समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार सीताराम पोकळे यांनी ही माहिती देताना सांगितले की, हा पुरस्कारवितरण सोहळा लवकरच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. पत्रकार अविनाश कदम यांना या आधीही दिल्ली, मुंबई, पुणे, बीड, पनवेल, अहिल्यानगर येथील विविध सामाजिक व पत्रकारीय संस्थांकडून अनेक सन्मान व पुरस्कार प्राप्त झाले आहेत.पत्रकार कदम यांना जिजाऊ माँसाहेब राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मराठी पत्रकार परिषद बीड जिल्हा, आष्टी तालुका युवा पत्रकार संघ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन व कौतुक व्यक्त केले जात आहे.


stay connected