जामखेड - नगर महामार्गावरच टाकले मुरूम- दगड अपघाताचा धोका ;मनमानी कारभार
कडा (प्रतिनिधी) जामखेड - नगर महामार्गवरील कडा येथील बस स्थानकासमोर रविवारी रात्री टेलीफोन वायरिंग कामासाठी खड्डा खादला होता असे येथील नागरिकांनी सांगितले. रस्त्यावर टेलिफोन वायरिंग, पाण्याची पाइपलाइन इतर कशाचेही काम चालूच असते. परंतु ज्या कामासाठी खड्डा खादला ते काम झाल्यावर पुन्हा आहे तसा खड्डा बुजवून का घेत नाही ? रविवारी रात्री कडा बस स्थानकासमोर खड्डा खादला परंतु त्या खड्ड्यातील निघालेले मुरूम,दगड चक्क नविन झालेल्या सिमेंट रस्त्यावरच टाकले आता या मुरूम दगडावरून वाहने घसरून अपघात झाला तर ? याची काळजी का घेत नसतील ? या मनमानी पद्धतीने चाललेल्या कामावर संबंधित अधिकारी लक्ष देतील का ? प्रवाशांच्या जिवाशी असा वेडा खेळ खेळू नये अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


stay connected