जामखेड प्रतिनिधी
बिबट्या सदृश प्राण्याच्या हल्ह्यात खांडवी येथील वृध्द महिला गंभीर जखमी.
घटनेची माहिती समजतात जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आणि त्या महिलेची विचारपूस करून नातेवाईकां बरोबर चर्चा करून तेथील संबंधित डॉक्टरांना सगळी माहिती विचारून त्यांना सहकार्य करण्यास सांगितले
सध्या जखमी महिला अतिदक्षता हॉल मध्ये ठेवले आहे
बिबट्या सदृश प्राण्याच्या हल्ह्यात तालुक्यातील खांडवी येथील वृध्द महिला गंभीर जखमी झाली असून, या बिबट्या सदृश प्राण्याने दोन बोकड आणि एका कुत्र्याला मारले आहे.
खांडवी परिसरात सोमवारी (ता.१) सायंकाळी साडेपाच वाजणेच्या सुमारास बिबट्या सदृश प्राण्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. खांडवी येथील चव्हाण शेतवस्तीवर राहणा-या उषाबाई सौदागर चव्हाण ( वय ४५) या बिबट्या सदृश प्राण्याने केलेल्या हल्ह्यात गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना उपचारासाठी अहिल्यानगरला हलवण्यात आले आहे. सायंकाळी साडेपाच वाजणेच्या सुमारास बिबट्या सदृश प्राण्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. उषाताई चव्हाण या आपल्या शेतातील तुरीच्या शेंगा तोडत असताना बिबट्या सदृश प्राण्याने उषाताई वर हल्ला केला. यावेळी या प्राण्याने त्यांच्या पायाचा चावा घेत तब्बल ४० ते ५० फुट लांब ओढत नेले. यादरम्यान त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर महादेव घोरपडे यांनी त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली. त्यांनतर बिबट्या सदृश प्राण्याने उषाताई यांना सोडून धूम ठोकली.
दरम्यान चव्हाणवस्तीवर येण्यापुर्वी बिबट्या सदृश प्राण्याने या वस्तीलगतच्या सावता राऊत वस्तीवरील दोन बोकड आणि एका कुत्र्यावर हल्ला करून जीवे मारले.
दरम्यान वनविभागाचे वनपाल रवी राठोड,वनरक्षक नागेश तेलंगे, शांतीनाथ सपकाळ, वनकर्मचारी श्याम डोंगरे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. याठिकाणी या प्राण्याचे ठसे मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असुन, अंधार पडल्याने त्यांना ठसे मिळवताना अडचण आली. पर्यायाने मंगळवारी सकाळी ठसे मिळवण्याचा प्रयत्न करणार आहेत.
प्रतिक्रिया —




stay connected