किडनॅपिंग व पोक्सो च्या आरोपातून दोन आरोपींची निर्दोष मुक्तता
अहिल्यानगर- अल्पवयीन मुलीस फुस लावुन जबरदस्तीने अपहरण करून पळवून नेल्याच्या आणि अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्पा आरोपातून दोन आरोपींची अहिल्यानगर येथील प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे मॅडम यांनी निर्दोष मुक्तता केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अहमदनगर येथील कोतवाली पोलीस ठाण्यात पिडितेच्या वडिलांचे फिर्यादी वरुन आकाश उर्फ सचिन अंकुश मिसाळ आणि शरद म्हस्के यांनी जबरदस्तीने किडनॅपिंग केले म्हणून त्यांचे विरुद्ध भादवि 1860 चे कलम 363,366 सह 34 आणि अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केले म्हणून पोक्सो ॲक्ट 2012 चे कलम 11(iv) नुसार गु.र.न. I-509/2021 चा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सदर खटल्याची सुनावणी प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे मॅडम यांचे समोर झाली. सरकार पक्षाकडून एकंदरीत सात साक्षीदार तपासण्यात आले. परंतु कोतवाली पोलीस स्टेशन चे पोलीस यांनी ज्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला त्या प्रमाणे कुठलाच प्रकार घडला नाही, पिडितेने स्वतः फोनवरून आरोपी सचिन यास बोलावून घेतले होते असे उलटतपासणीत निष्पन्न झाले. तसेच तपासी अंमलदार यांनी सुध्दा गुन्ह्याचा तपास करताना व दोषारोपपत्र दाखल करताना परिपूर्ण काळजी न घेतल्याने आरोपीना विनाकारण काही दिवस तुरुंगात रहावे लागले ही बाब न्यायालया समोर आरोपीच्या वतीने मांडण्यात आली. पिडिता सज्ञान झाल्यानंतर आरोपी सचिन व पिडितेने स्वखुशीने विवाह केल्याचे निष्पन्न झाले. तसेच आरोपीनी पिडितेस कधीच जबरदस्तीने किडनॅपिंग केले नाही आणि अल्पवयीन पिडीतेचे लैंगिक शोषण केले नाही ही बाब सुध्दा आरोपीचे वतीने न्यायालया समोर मांडण्यात आली. सदर खटल्यात आरोपीनी गुन्हा केल्याची बाब निष्पन्न झाली नाही म्हणून या सर्व बाबींवर सविस्तर कायदेविषयक बाबी तपासून प्रधान जिल्ह्या न्यायाधीश यांनी सीआरपीसी 1973 चे कलम 235(1) नुसार आरोपी सचिन उर्फ आकाश अंकुश मिसाळ व शरद रावसाहेब म्हस्के यांची सर्व गुन्ह्यातुन निर्दोष मुक्तता केली.
आरोपीच्या वतीने पुरूष हक्क संरक्षण समिती अहिल्यानगरचे अध्यक्ष ॲड शिवाजी अण्णा कराळे, ॲड करुणा रामदास शिंदे, ॲड सत्यजीत शिवाजी कराळे आणि ॲड मोनाली बन्सी कराळे यांनी कामकाज पाहिले.
==================


stay connected