लोहा तालुक्यात रब्बीचे क्षेत्र वाढणार;यंदा १४ हजार ९० हेक्टरवर रब्बी पिकांचे नियोजन

 लोहा तालुक्यात रब्बीचे क्षेत्र वाढणार;यंदा १४ हजार ९० हेक्टरवर रब्बी पिकांचे नियोजन



लोहा :-चंद्रकांत वाघमारे 


लोहा तालुक्यात चालू वर्षी रब्बी हंगामाचे क्षेत्र लक्षणीय वाढणार आहे. २०२५-२६ या हंगामात तालुक्यात एकूण १४ हजार ९० हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी होणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी रब्बी क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून येते.


तालुक्यातील काही भाग गोदावरी नदीच्या काठावर तर काही लिंबोटी धरणाच्या परिसरात असल्याने रब्बी पिकासाठी पोषक भौगोलिक परिस्थिती उपलब्ध आहे. यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या विहिरी, बोरवेल, साठवण तलाव आणि शेततळ्यात मुबलक पाणी साठले आहे. त्यामुळे रब्बी पेरणीसाठी अनुकूल वातावरण तयार झाले असून शेतकऱ्यांचा उत्साह वाढला आहे.


रब्बी पिकांच्या अंदाजपत्रकासाठी संबंधित गावातील सहाय्यक कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक आणि ‘एसएमए’ यांच्या माध्यमातून प्राप्त माहितीच्या आधारे आकडेवारी निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी प्रशांत कासराळे यांनी दिली.


***** 



 लोहा तालुक्यात रब्बी क्षेत्र वाढणार



“लोहा तालुक्यात गेल्या ४३ वर्षांत एवढा पाऊस कधीच झाला नव्हता. त्यामुळे सध्या नदी-नाले तुडुंब भरले असून जलसाठ्यांमध्ये मुबलक पाणी उपलब्ध आहे. याच कारणामुळे यंदा तालुक्यात रब्बी क्षेत्रात लक्षणीय वाढ होणार आहे,”


प्रशांत कासराळे

तालुका कृषी अधिकारी लोहा 




******* 



रब्बी ज्वारी-2122

गहू-4496

रब्बी मका-135

इतर तृणधान्य-16

एकूण रब्बी तृणधान्य-6749

हरभरा- 6861

इतर कडधान्य-14

एकूण रब्बी कडधान्य-6875

एकूण रब्बी अन्नधान्य-13624

करडई-338


चियासीड लागवड-120

इतर गूणीतधान्य-8

एकूण गूणीतधान्य-466


एकूण रब्बी क्षेत्र- 14090


*********



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.