घाटनांदूर येथे आंतरभारतीची स्थापना* *अध्यक्षपदी डॉ. सुलभा पाटील तर सचिवपदी रमेश मोटे यांची निवड*

 *घाटनांदूर येथे आंतरभारतीची स्थापना* 
*अध्यक्षपदी डॉ. सुलभा पाटील तर सचिवपदी रमेश मोटे यांची निवड*






घाटनांदूर-


आंतरभारतीचे राष्ट्रीय मार्गदर्शक अमर हबीब यांच्या शुभहस्ते घाटनांदूर येथे दीप हस्तांतरीत करून आंतरभारती शाखेचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.सुलभा पाटील होत्या. 


खरा भारत हा खेड्यापाड्यातच आहे म्हणून आंतरभारतीचे विचार व कार्यक्रम ग्रामीण भागात रुजवणे गरजेचे आहे. असे सांगून अमर हबीब म्हणाले की, साने गुरूजींनी दिलेला आंतरभारतीचा विचार ग्रामीण लोकांपर्यत पोहचला  पाहिजे. घाटनांदूरची शाखा त्याची सुरुवात आहे. अमर हबीब यांनी स्पष्ट केले की, आम्ही गांधीजींच्या विचारावर चालणारे आहोत, गोडसेच्या विचाराचे विरोधक आहोत.


या सभेत आंतरभारतीच्या घाटनांदूर शाखेच्या अध्यक्षपदी डॉ सुलभा पाटील व सचिवपदी रमेश मोटे यांची एकमताने निवड करण्यात आली. दत्ता वालेकर मार्गदर्शक असणार आहेत.

 

 या प्रसंगी अमर हबीब यांनी  संपादित केलेल्या "गुलामीकडे बोट" या काव्य-चित्र संग्रहाचे विमोचन डॉ. सुलभा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शेतकऱ्यांच्या गुलामीकडे बोट दाखविणाऱ्या किसानपुत्रांच्या कविता व चित्राचा समावेश आहे. आंबाजोगाईच्या राजेश रेवले, रमेश मोटे, दत्ता वालेकर व अमर हबीब याकच्या कविता या संग्रहा lत प्रकाशित झावल्या आहेत.


अमर हबीब यांची शिरूर कासार येथे होणाऱ्या सातव्या सिंदफणा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल घाटनांदूर येथील साहित्य प्रेमींनी त्यांचा सत्कार केला.


विचार मंचावर अमर हबीब, डॉ.सुलभा पाटील, किरण देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दत्ता वालेकर यांनी केले.


कार्यक्रमाला श्रीमती शोभा पाटील, श्रीमती सी. ए. देशमुख, खंडाळे मॅडम, वंदना तेलंग, सीता राजपूत, डॉ. आर. ए. नाकाडे, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. संतोष बोबडे, शरद लंगे, महावीर भगरे, नागनाथ बडे, रमेश मोटे, हनुमान दरगड, उत्तम  शिंगाडे, संजय आवाड, शेख मुख्तार, विठ्ठल मंदे, गोविंद थडवे, शिलाताई कांबळे. आदी उपस्थित  होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.