संत निरंकारी मिशन व निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन जामखेड ब्रांचचा आगळावेगळा उपक्रम स्वार्थ बाजूला ठेवून परमार्थतेचा मानवतेचा संदेश..!
निवडणुकांच्या रणधुमाळीत प्रेरणादायी मानवतेचा संदेश व समाज हितगुज मोठा संदेश दिला.
सद्गुरु माता सुदिक्षा जी महाराज यांच्या कृपाशिर्वादाने, संत निरंकारी मिशन तसेच संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन व जामखेड ब्रांच झोन अहिल्यानगर 36 A या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
"रक्त नाडियों में बहे, नालियों में नहीं" — निरंकारी बाबा हरदेव सिंह जी महाराज यांच्या प्रेरणादायी संदेशातून मानवतेचा मौल्यवान संदेश देत हे शिबिर अत्यंत उत्साहात पार पडले.
या शिबिराला जामखेड तालुक्यासह कर्जत, श्रीगोंदा, शेवगाव, करमाळा, पाथर्डी, पारगावघुमरा,पिठी नायगाव अशा विविध ठिकाणांहून मोठ्या संख्येने निरंकारी भक्तांनी सहभाग नोंदवला.
हे रक्तदान शिबिर बुधवार, दि. 26 नोव्हेंबर 2025, सकाळी 9 ते 4 या वेळेत
गयाबाई शेटे मंगल कार्यालय, जैन स्थानक समोर, मेन रोड जामखेड, जिल्हा अहिल्यानगर येथे पार पडले.
या प्रसंगी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित दादा पवार, तसेच जामखेडमधील सर्व समाजिक, शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर आणि विविध पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिरात सन्मानित मान्यवर आणि जबाबदार व्यक्तींचे आणि निरंकारी सेवादारांचे विशेष योगदान उल्लेखनीय राहिले:
हरीश जी खुबचंदानी, झोनल इन्चार्ज, झोन 36A, अहिल्यानगर
आनंद कृष्णाणी जी, क्षेत्रीय संचालक, 36A, अहिल्यानगर
यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले
सूत्रसंचालन धीरज भोसले जी यांनी केले
यावेळी 121/रक्तदात्यांनी रक्तदान केले
शिबिराला आलेल्या सर्व रक्तदात्यांचे, मान्यवरांचे, तसेच निस्वार्थपणे सेवा देणाऱ्या सेवाधारांचे मनःपूर्वक आभार जामखेड ब्रांचचे मुखी श्री. अमित गंभीर यांनी आणि भरत देडे जी सेवा दल इन्चार्ज जामखेड यांनी मानले.
मानवतेसाठी, परमार्थासाठी आणि “रक्तदान हेच महादान” या संदेशासाठी दिलेला समाजाचा प्रतिसाद खरोखरच प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा रुग्णालय रक्तपेढी अहिल्यानगर यांचे सहकार्य लाभले


stay connected