*इस्रायल - पॅलेस्टाईन मध्ये* *युध्दविराम नव्हे*.
*तात्पुरता शांतता विराम*
*✍️*युन्नूस तांबोळी.अकलूज*.
हमासच्या आत्मघातकीपासून प्रारंभ होऊन गेली दोन वर्षे पॅलेस्टाईनमध्ये सुरु असले ला इस्रायल प्रणीत अमानुष नरसंहार म्हणजे जालीयनवाला बागेत निशःस्त्र जमावावर बेछूट गोळीबार करणारा जनरल डायर ,गाझात महिला ,बालके , रुग्णालये यावर एकापेशा एक नरसंहारक शस्त्रे डागून हजारोंचे प्राण घेणारा जनरल नेतान्याहू.
नेतान्याहू यांनी सर्व पॅलेस्टाईनींना हुसकावून सार्या प्रांतावर यहुधी ध्वज फडकविण्याचया धुंदीत जवळजवळ 70 हजार पॅलेस्टाईनींचे प्राण घेतले.
यात 20हजार बालके आहेत
1948 मध्ये इस्रायलची स्थापना आणि त्यानंतरच्या युध्दांमुळे पॅलेस्टीनी लोकांची मोठ्यात प्रमाणात हकालपट्टी झाली.तेव्हापासून गाझा पट्टीत निर्बंध लादले जात आहेत.त्यांच्या स्वातंत्र्ययवर मर्यादा आलेल्या आहेत.
हमासने दोन वर्षांपूर्वी केलेल्या हल्ल्यात ज्या इस्रायलींना ओलीस ठेवले. ते गुन्हेगार नव्हते हे ही तितकेच खरे.
पश्चिम अशियातील अशांततेचे खरे कारण, बेंजामिन नेतान्याहुचा भ्रष्टाचार. आपल्यावरील भ्रष्टाचाराचा खटला लांबणीवर पडावा या हेतूने त्यांनी स्वतःच्या देशास युध्द स्थितीत ठेवले.
दहशतवादाला स्थान नसलेल्या स्वातंत्र्य पॅलेस्टाईनची निर्मिती व त्यांचे इस्रायलबरोबरचे शांततामय सहजीवन हे या प्रश्नाचे एकमेव उत्तर आहे. मात्र शांततेसाठी इस्रायलचे
पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू तयार होणार नाहीत. हमासने चर्चा, वाद, संवाद, अशा अनेक सनदशीर मार्गाने आपल्या माय भूमी बाबतचा प्रश्न उपस्थित केला याकडे सर्वांनी दुर्लक्ष केले वास्तविक या परिसराचे नाव पॅलेस्टाईन आहे इस्त्राईल तिथे नंतर आला अमेरिकेच्या मदतीने यहुदी चे राज्य आणणे इस्राईलचे ध्येय म्हणून इजिप्त मध्ये शांतता शिखर परिषदेत परिषदेच्या परिषदेच्या आयोजनात ट्रम्प च्या म्हणण्यानुसार युद्धविराम दिला मात्र हा युद्धविराम नाही तर तो पॅलेस्टाईन आणि इस्त्राईल मध्ये तात्पुरता शांतता विराम आहे.



stay connected