*अमेरिका-भारत व्यापार कराराचा गुंता लवकर सोडवायला हवा !*
📚✍🏻 *युन्नूस तांबोळी, अकलूज.९८६०२६६४००*
*अमेरिकेने भारतावर ५० टक्के शुल्क आकारले आता व्हिसा शुल्कवाढ केली ,आणि त्याच वेळी चाबहार बंदरात काम करण्यासाठी भारतीय कंपन्यास दिल्या गेलेल्या सवलती रद्द केल्या*, *असे एकापाठोपाठ एक धक्के ट्रम्पने भारतास देऊन जागतिक पातळीवर कोंडी केलेली आहे* .
*याआधी अमेरिकेस चीनशी मुकाबला करताना भारताची गरज होती म्हणून स्वस्तात मजुरांची आवश्यकता होती म्हणून तो अधिकाधिक भारतीय गोड मानून घेत होता. आता अमेरिकेची ती गरज संपली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता विकासामुळे स्वस्तातील भारतीय मजुरांची त्या देशास गरज नाही*.
*खरे तर तंत्रज्ञान संशोधन विकास यातील गुंतवणूक आपण यावर एक टक्काही खर्च करत नाही हेही फार मोठी शोकांतिका आहे*.
*'एच वन बी' व्हिसाधारकांतील ७१ टक्के वाटेकरी भारतीय आहेत यामुळे या निर्णयाचा फटका भारताला नक्कीच बसणार आहे*.
*आज भारताला कोंडी करण्याचे प्रयत्न जागतिक पातळीवरून होत आहे ,कॅनडाने भारताच्या आयातीवर निर्बंध लादले ,इंग्लंड ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड ने देखील भारतीय कर्मचाऱ्यांससरसकट स्वीकारण्यास बंधने आणलेली आहेत फ्रान्स सुद्धा ह्याच तयारीत आहे*.
*'एच वन बी 'व्हिसाधारी हे उच्चशिक्षित मुजरापेक्षा अधिक नाहीत हे स्वीकारावे लागेल. अमेरिकेची आस्थापना चालविण्यासाठी अत्यंत अल्प मोबदल्यात भारतीय फौज संबंधित कंपनीच्या सेवेसाठी उपलब्ध होती*.
*ट्रम्प यांच्या व्हिसा शुल्क वाढ निर्णयामुळे अमेरिकेत न जाता येथून अमेरिकी कंपन्या सेवा देण्याचे प्रमाण वाढेल असे अनेकास वाटते आहे हे मात्र नक्कीच चुकीचे आहे*.
*नवतंत्रज्ञानात अमेरिकेचा वाटा ३१ टक्क्यावर चीनचा ३१ टक्के एवढा आहे भारत मात्र १.४ टक्क्यावरच आहे देशात जागतिक दर्जाच्या कंपन्या स्थापन व्हाव्यात आणि उत्पादनाची निर्मिती व्हावी तरच आपण अमेरिकेस उत्तर देऊ*.


stay connected