सय्यद गुरुजींनी अनेक विद्यार्थी घडवले - गंगाधरराव भागवत
आष्टी प्रतिनिधी
सय्यद अमीनोद्दीन गुरुजी त्यांना सर्वजण सय्यद गुरुजी म्हणत.आज पासून साठ,बासस्ट वर्षांपूर्वी मौजे चिंचाळा येथून सुलेमान देवळा या दूरच्या गावी जि.परिषदेचे शिक्षक या नात्याने सय्यद गुरुजी पहाटे निघून प्रार्थनेच्या वेळी शाळेत पोहोचत.अपार कष्ट करण्याची क्षमता अंगी बाळगणारे हे हाडाचे शिक्षक होते.त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले.त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी समाजात नावलौकिक मिळविला. मी तरुण असताना सय्यद गुरुजी सोबत काम करण्याची मला संधी मिळाली.एक परिश्रमी शिक्षक काय असतो हे मी जवळून अनुभवले आहे.असे जुन्या पिढीतील शिक्षक गंगाधरराव भागवत हे सय्यद गुरुजी यांच्या विषयी बोलताना म्हणाले.
आष्टी जि.बीड येथे जि.प.मुलांच्या शाळेला सय्यद गुरुजी साहित्य अकादमीच्या वतीने,शिक्षक दिनाच्या निमित्ताने 51 पुस्तकाची पेटी सप्रेम भेट देण्यात आली,यावेळी सय्यद गुरुजी यांचे सहकारी शिक्षक गंगाधर भागवत गुरुजी बोलत होते.यावेळी महाराष्ट्र शासन आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रल्हाद यशवंत काळे आणि राजेंद्र लाड,संतोष दाणी, मु.अ.प्रकाश सातपुते,सतीश कोल्हे,गोरक्षनाथ लाड यांची भाषणे झाली.सर्व शिक्षकांचा यावेळी आदरपूर्वक सन्मान करण्यात आला.विवेकानंद शिक्षक पुरस्काराबद्दल संतोष दाणी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.मु.अ.शेख मॅडम,सहशिक्षक जयश्री मासाळकर,अनिता वायकर,सोले मॅडम,फिजा शेख मॅडम,सविता हुलजुते,राजेंद्र नवगिरे,डॉ.सय्यद हुमायुद्दीन,डॉ.सय्यद वलीयुद्दीन उपस्थित होते.सय्यद गुरुजी साहित्य अकादमीचे कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांनी सर्वांचे आभार मानले.
stay connected