धानोऱ्यात जुगार अड्ड्यावर छापा: साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
---------------------
अंभोरा पोलिसांची जुगार अड्ड्यावरची तिसरी कारवाई
---------------------
कडा / वार्ताहर
-------------------
आष्टी तालुक्यातील
धानोरा परिसरातील एका जुगार अड्ड्यावर अंभोरा पोलिसांनी सोमवारी सायंकाळच्या सुमारास अचानक छापा मारून साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त करून १३ जणांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे गेल्या पाच दिवसातील अंभोरा पोलिसांची ठाण्याच्या हद्दीतील जुगार अड्ड्यावरील ही तिसरी मोठी कारवाई केली आहे.
आष्टी तालुक्यातील धानोरा येथे एका शेतात जुगार अड्डा चालू असल्याची खबर अंभोरा पोलीसांना मिळाली. गोपनीय खबरीवरून पोलिसांनी सापळा रचून शेतातील अड्ड्यावर छापा टाकला. पोलिसांनी घटनास्थळावरून तेरा जुगारींना पकडून घेऊन मोबाईल, दुचाकी, जुगारीचे साहित्य असा एकूण ४ लाख ३० हजार ९३० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मंगेश साळवे, पोउपनि चंद्रकांत तावरे, आदिनाथ भडके, सातव यांनी कारवाई केली.
--------%%----------
तेरा आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल...
अंभोरा पोलिस ठाण्याचे अंमलदार सतीश पैठणे यांच्या फिर्यादीवरून संतोष शिवाजी शेळके, मनोजकुमार मनोहर माने, गंगाराम बाबू फुलमाळी, लक्ष्मण त्रिंबक शेळके (रा. धानोरा), आजिनाथ रामभाऊ गायकवाड, सुलेमान देवळा, प्रकाश रमेश ढोबळे, रामकिशन पंढरीनाथ भोसले (दोघे रा.शेरी खुर्द), नागाआप्पा बंडीवडर भिमाप्पा (रा. वरचगल, कर्नाटक) यांच्यासह अन्य पाच आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सपोनि मंगेश साळवे यांनी दिली.
------------%%------
stay connected