गणेशोत्सव हा मांगल्याचे प्रतीक; शांततेत साजरा करावा ----------------------- सपोनि मंगेश साळवे यांचे गणेश भक्तांना आवाहन

 गणेशोत्सव हा मांगल्याचे प्रतीक; शांततेत साजरा करावा 

-----------------------

सपोनि मंगेश साळवे यांचे गणेश भक्तांना आवाहन



-------------------

कडा / वार्ताहर 

-------------------

गणपती बाप्पाचा उत्सव भक्ती, सेवा आणि बंधुभावाचा आहे. गणेशोत्सव साजरा करताना न्यायालयाने घालून दिलेल्या नियमाचे पालन करून शिस्त, शांतता, परस्पर आदर राखून आनंदात साजरा करावा. असे आवाहन अंभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी केले आहे.

 

सार्वजनिक गणेशोत्सव हा मांगल्याचे प्रतिक असून हा उत्सव साजरा करताना समाजात जातीय, धार्मिक तेढ निर्माण करणारे मेसेज आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू नयेत. गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे. म्हणून वाद नव्हे तर एकोपा आणि एकमेकाबद्दल प्रेम, आदर करणे हाच या गणेशोत्सवाचा खरा संदेश आहे. त्यामुळे नियम व कायद्याचे पालन करून आपापल्या गावांमध्ये शांतता बंधुभाव राखून सर्व गणेश भक्तांनी हा उत्सव खेळीमेळीच्या उत्साही वातावरणात साजरा करावा. असे आवाहन सपोनि मंगेश साळवे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

--------%%--------





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.