*ट्रम्प आणि मस्क - एका नव्या सरंजाम शाहीचे प्रतिनिधी ?*
✍🏻
*युन्नूस तांबोळी, अकलूज.*
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि उद्योगपती एलाॅन मस्क यांच्या धोरणाविरोधात अमेरिकेची राजधानी वाॅशिंग्टन डीसीसह व सर्व ५० राज्यातील प्रमुख शहरे आणि अमेरिकेबाहेरील देश चीन,जपान, जर्मनी इंग्लंड,या शहरात जोरदार निदर्शने झाली.
अमेरिकेच्या राजकारणात ट्रम्पच्या लहरी धोरणाने जगभरात खळबळ उडवून दिली.कार्पोरेट क्षेत्र हादरले आणि प्रचंड जनआंदोलन "हॅंडस ऑफ!" च्या रूपात अमेरिकेला बेकारी व महागाई कडे नेणारे धोरण आहे, यामुळे अमेरिकन नागरिकांत प्रचंड असंतोष निर्माण झाला. यामुळे लोक रस्त्यावर उतरले.
हे केवळ जनआंदोलन नाही तर लोकशाही वाचविणे, नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण, सामाजिक न्यायाला तडा जाऊ नये आणि कामगारांचे हक्क अबाधित रहावे, अशी भावना जनमानसांत निर्माण झाली.
ट्रम्प यांच्या पुन्हा राष्ट्राध्यक्ष पदांवर आगमनानंतर आणि एलाॅन मस्कला सरकारी विभागाचा प्रमुख केल्यानंतर अमेरिकन नागरिकांत प्रचंड उसळलेला असंतोष रस्त्यावर पहायला मिळाला.
मस्क याला सरकारी विभागाचा प्रमुख बनवल्यानंतर मस्क यांनी सरकारी खर्चात कपात करून सामाजिक योजना बंद केल्या.यामूळे हजारो बेरोजगार झाले.मस्कच्या कंपन्या (टेस्ला,स्पेसएक्स x) यांना मोठ्या प्रमाणावर कर सवलती व कान्ट्रॅक्ट मिळाले.यामुळे मस्कच्या उत्पन्नात भर पडली.मात्र अमेरिकन जनतेत बेरोजगारी वाढली.ट्रम्पने एकट्या मस्कसाठी आख्खा देश संकटात टाकलेला आहे.
मस्कच्या कारखान्यांमध्ये कामाचे तास वाढवून रोजगार कमी दिला जात आहे.अशी सरकारी संघटना मध्ये तक्रारी वाढल्या.सरकारी कपातीमुळे बेरोजगारी वाढण्यात मदत झाली.
मस्क यांनी शिक्षण आणि इतर आणि सामाजिक क्षेत्रांमध्ये कपात सुचविल्यांने श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब होत चालला आहे.
ट्रम्प यांच्या नव्या कार्यकाळात स्थलांतरावर कडक नियम, सामाजिक योजना बंद आणि नोक-र्या मध्ये हे सर्व लागू झाले.या निर्णयाचा फटका जनतेला बसला. केवळ सत्ताधारी आणि उद्योगपती यांची हातमिळवणी झाली तर काय होऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे सध्याची अमेरिकेतील स्थिती.
जेव्हा आंदोलन सरकारविरोधात नाही तर,एका विचारधारे विरोधात आहे अशी भावना जनमानसांत निर्माण होऊन जिथे सत्ताधारी आणि उद्योगपती एकत्र येतात, जनतेच्या हक्कांवर गदा आणतात तेव्हा काय होते याचे उदाहरण म्हणजे "हॅडस ऑफ!"आंदोलन.
stay connected