*लोकनेत्या पंकजाताईंचे नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यात भाजप स्थापनादिन उत्साहात साजरा*- शंकर देशमुख
बीड दि.६(प्रतिनिधी) लोकनेत्या ना.पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यातील १३ मंडळात भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला असल्याची माहीती भाजप जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे
दि ६ एप्रिल हा भाजपचा स्थापना दिन असुन या वर्षी हा स्थापना दिन देशभरात भाजपने मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचे ठरविले होते कारण हा स्थापना दिन व प्रभू श्रीराम नवमी एकाच दिवशी आली आहे अयोध्येत प्रभू श्रीरामाचे मंदिर भव्य झाले आहे त्याच प्रमाणे महाराष्ट्रात भाजपचे देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाले आहे त्याप्रमाणे भाजपचे संघटन पर्व सुरु असल्याने आणि भाजपने महाराष्ट्रात १.५० कोटी भाजप सदस्य संख्येचे उद्दीष्ठ पूर्ण केले असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी कार्याध्यक्ष श्री रविंद्र चव्हाणजी यांनी महाराष्ट्रात हा स्थापनादिन महाराष्ट्रातील प्रत्येक बुथ स्तरावर हा साजरा करण्याचे आवाहन केले होते बीड जिल्ह्यात लोकनेत्या ना.पंकजाताई यांच्या नेतृत्वाखाली ११ तालुक्यातील १३ मंडळात हा स्थापना दिन करण्यात आला प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या घरावर पक्षाचा झेंडा लावून सेल्फी घेतला तसेच मंडळात सकाळी ९ वा कार्यालयावर पक्षाचा झेडा फडकवून भारतमाता,पंडीत दीनदयालजी,डॅा शामा प्रसादजी,प्रमोद महाजन गोपीनाथजी मुंडे यांचे प्रतिमापूजन केले व दुपारी १.३० वा स्क्रिन लाऊन आॅनलाईन स्थापना दिना निमित्ताने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचे मार्गदर्शन कार्यालयात संपन्न केले परळी अंबाजोगाई माजलगाव कडा आष्टी गेवराई बीड वडवणी धारुर केज आदी ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाले व विविध नेत्यांनी मार्गदर्शन ही केले बीड जिल्ह्यात दोन लाख भाजप सदस्य झाले असल्याचे ही श्री शंकर देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे
stay connected