ट्रम्पच्या आयातशुल्क धोरणाने भारताची अर्थव्यवस्था चिंतीत

 *ट्रम्पच्या आयातशुल्क धोरणाने भारताची अर्थव्यवस्था चिंतीत*

✍🏻 *युन्नूस तांबोळी अकलूज.*



        

      कॄषी उत्पादने, मोटार आणि संबंधित उद्योग , औषधे आणि मद्य ह्या चार विषयांने अमेरिका चिंतेत होती,यावर तोडगा म्हणून ट्रम्प यांनी भारतावर २६ टक्के आयात शुल्क लादून भारताच्या अर्थव्यवस्थेला धक्का दिलेला आहे.

   महसुली तूट कमी करून देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी करवाढ केलेली आहे,असे ट्रम्प सांगत असले तरी याचा फटका जगाच्या अर्थव्यवस्थेला होणार आहे.अमेरिकेच्या वस्तूंवर भारत मोठ्या प्रमाणावर आयात शुल्क लावत असल्याचा आरोप ट्रम्प करत आहेत.त्यातील"हार्ले डेव्हिडसन" या अतिश्रीमंत दुचाकीवर भारतात आकारल्या जाणाऱ्या करावर ट्रम्प नाराज होते.

     इकडे पहाटेपर्यंत वक्फ बोर्ड बिलावर संसदेत सत्ताधारी बिल पास करून घेण्यासाठी जीवाचे रान करत होती तिकडे ट्रम्पने मित्र मोदींना २६टक्के आयात शुल्काची भेट दिली होती. तिकडे मोदी अमेरिकेत असतानाही ट्रम्पने भारतीय निर्वासितांच्या हातात पायात बेड्या ठोकून लष्करी विमानाने भारतात पाठविले.आपण या घटनेचा निषेध केला, मात्र तो निषेध ट्रम्प पर्यंत पोहोचला नाही. जगाने मात्र ठणकावून अमेरिकेला बजावले.



     भारताने करकपातीला होकार दिला तर घरगुती उद्योग धोक्यात येतील व नकार दिला तर अमेरिकेबरोबरचे व्यापारी संबंध बिघडतील अशा द्विधा मनस्थितीत भारताची कोंडी झालेली आहे.

    ट्रम्पच्या या लहरी धोरणाचा जगाला फटका बसणार आहे, आपण अमेरिके बरोबर जगाला आर्थिक मंदीकडे लोटत आहोत याचे भान ट्रम्पला राहिलेले नाही.अब्जावधी डॉलरच्या कर्जाच्या खाईत अमेरिका अडकली आहे,त्याची वित्तीय तूट भरून काढण्यासाठी ट्रम्प मनमानेल तसा आयात शुल्क लादत आहे,हा अन्याय जगाला सहन करावा लागत आहे.

       राजकीय निकड म्हणून धरसोड करण्याच्या केंद्र सरकारच्या वॄत्तीमुळे फक्त भारतीय उद्योगांनाच नाही तर, शेतकऱ्यांना फटका बसत, मध्यमवर्गीय अधिक पिचला जात आहे.या सर्व गदारोळात बेकारी वाढणार आहे. हे नक्की.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.