तुम्ही चालत राहा.. पाठींबा मिळेलच... या भावनेतुन राजकारण सुरूच ठेवणार - माजी आ.भीमराव धोंडे
आष्टी (प्रतिनिधी)- आपण महेश सह.साखर कारखाना सुरु करणर आहोत. काही लोक कारखाना कसा सुरु होणार नाही यासाठी अडचणी आणत आहेत परंतु त्यांच्या या कुटील डावाला भिक न घालता आपण आपल्या पध्दतीने कारखाना सुरु करणारच आहोत. तांत्रिक मुद्दे मांडत अडचणी आणण्याचा प्रयत्न कोण करतयं ? हेही सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना माहित आहे.महेश सह.साखर कारखान्याचे पाच तालुक्याचे कार्यक्षेत्र आहे.भाजप तालुकाध्यक्ष ॲड.साहेबराव म्हस्के,अजय धोंडे व माझे भाजपने निलंबन केलेले आहे. ते निलंबन रद्द करावे यासाठी आम्ही पक्षश्रेष्ठीकडे पत्र देऊन मागणी कलेली आहे.आमचे निलंबन रद्द होणारच आहे. सामाजिक व राजकीय कार्य सुरुच ठेवणार आहे.तुम्ही चालत राहा.. पाठींबा मिळेलच... या भावनेतुन राजकारण सुरूच ठेवणार असल्याचे प्रतिपादन माजी आ.भीमराव धोंडे यांनी सांगीतले.
यावेळी माजी आ.भीमराव धोंडे,भाजपचे तालुकाध्यक्ष ॲड.साहेबराव म्हस्के,नियामत बेग,डाॕ.अजय धोंडे,चेअरमन राजेंद्र धोंडे,अशोक साळवे, बबन औटे,महाराष्ट्र केसरी सईद चाऊष,लालाभाऊ कुमकर,ॲड.रत्नदीप निकाळजे,संभाजी जगताप, बाबासाहेब आंधळे,रावसाहेब लोखंडे, हरिभाऊ जंजीरे,दादा जगताप,मोहन खेडकर,सदा पाटील दिंडे,उत्तम बोडखे, अरुण सायकड,अस्ताक शेख, शाम सांगळे,बजरंग कर्डीले, विनोद ढोबळे,रोहिदास कर्डीले, गौतम सावंत,सरपंच अभय गर्जे,बाळासाहेब वाघुले, आण्णासाहेब लांबडे,लिंबराज कर्डीले,नानाभाऊ वाडेकर, ॲड.नवनाथ विधाते,गौतम ससाणे,सोपान गाडे,नंदु फसले, विठ्ठल लांडगे,बाळासाहेब शेकडे,नानाभाऊ वाडेकर, परमेश्वर खेडकर,युवराज खटके
आबा तावरे,बबन सांगळे,मोहन झगडे,हादी शेख,अतुल मुळे, सोनाजी गांजुरे,कुंडलीक आस्वर,बाबा ससाणे,शेख अज्जुभाई,बाबासाहेब गायकवाड,बाबासाहेब गर्जे यांच्यासह पदाधिकारी,कार्यकर्ते व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजप तालुकाध्यक्ष पदासाठी लालाभाऊ कुमकर,संभाजी जगताप,दादासाहेब जगताप, हरिभाऊ जंजिरे,अॕड.रत्नदीप निकाळजे,अभय गर्जे,गौतम ससाणे,बाळासाहेब शेकडे, रघुनाथ शिंदे,नानाभाऊ वाडेकर,परमेश्वर खेडकर, युवराज खटके यांनी इच्छा व्यक्त केली.या बैठकीचे अध्यक्षस्थानी बबनराव औटे हे होते.
आष्टी विधानसभा मतदार संघाचे माजी आ.भीमराव धोंडे यांनी भाजप तालुकाध्यक्ष पदासाठी इच्छुक कार्यकर्त्यांची बैठक गुरुवारी दि.१० एप्रिल रोजी झाली.तालुकाध्यक्ष पदाचे इच्छुकांची नावे ना.पंकजाताई मुंडे आणि पक्षाच्या वरीष्ठांकडे सादर करण्यात येणार आहेत.पंकजाताई जे नाव तालुकाध्यक्ष पदासाठी जाहीर करतील ते आपल्याला मान्य असेल असे माजी आ.भीमराव धोंडे यांनी यावेळी सांगितले. निर्भिडपणे रहा,कुणालाही घाबरण्याची गरज नाही? कोण काय करत नसतं,आपण पण इथलेच आहोत.असा कानमंत्र उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.निवडणुका येत असतात ..जात असतात आपला पराभव झाला म्हणून हार मानायची नाही. पुन्हा जोमाने कामाला सुरुवात करायची, कुणाला घाबरायच पण नाही. निर्भिडपणे रहायचं. आपण पण इथलेच आहोत.जर कोणी दम दिला तर व्हिडिओ काढायचा सोशल मिडीयावर टाकायचा क्राईम पोलिसच गुन्हा दाखल करतात. कारवाई करतात. नव्या जोमाने पुन्हा कामाला लागा असेही धोंडे यांनी यावेळी सांगितले.
stay connected