कड्यात विश्व नवकार महामंत्राचा सामुहिक जाप
--------------------
कडा / वार्ताहर
------------------
मानवाच्या जीवनातील समस्या दूर होऊन सर्वत्र शांतता नांदावी, मानवाचा सर्वांगीण विकास व्हावा, आरोग्य व संपदा प्राप्त व्हावी, यासाठी हा विश्व नवकार महामंत्राचा सामुहिक जाप करण्यात आला. याप्रसंगी जैन श्रावक, श्राविका व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कडा शहरात जीतो अमोलक जैन शिक्षण संस्था व जैन श्रावक संघाच्या वतीने अमोलक संस्थेच्या प्रांगणात सामूहिक विश्व नवकार महामंत्र जाप या कार्यक्रमाचे बुधवार दि.९ एप्रिल रोजी सकाळी ठिक ७ ते ९ या वेळेत जैन साध्वी परमपूज्य पुष्पचुलाजी म.सा. व परमपूज्य सुप्रियदर्शनाजी म.सा. यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
----------%%-------
stay connected